TATA ची सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार; पॉवरफूल रेंज आणि लूकही स्टायलिश!

भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सने त्यांची लोकप्रिय कार टाटा नॅनो इलेक्ट्रिकमध्ये सादर करण्याची घोषणा केली आहे.

Pravin Dabholkar | Jan 24, 2025, 16:37 PM IST

Tata Nano Electric 2025: भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सने त्यांची लोकप्रिय कार टाटा नॅनो इलेक्ट्रिकमध्ये सादर करण्याची घोषणा केली आहे.

1/8

TATA ची सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार; पॉवरफूल रेंज आणि लूकही स्टायलिश!

Tata Nano Electric 2025 Powerful Range stylish Budget friendly Car Tech News

Tata Nano Electric 2025: भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सने त्यांची लोकप्रिय कार टाटा नॅनो इलेक्ट्रिकमध्ये सादर करण्याची घोषणा केली आहे. ही नवीन टाटा नॅनो इलेक्ट्रिक 2025 पर्यावरणाबाबत जागरूक ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय आहे. यासोबतच ती तिची किंमतही परवडणारी आणि फिचर्सही आकर्षक आहेत. (फोटो सौजन्य-एआय)

2/8

सुधारित सुरक्षासंबंधी फिचर्स

Tata Nano Electric 2025 Powerful Range stylish Budget friendly Car Tech News

टाटा नॅनो ईव्हीची रेंज 315 किलोमीटर असेल. जी शहर आणि महामार्गावर चालण्यासाठी योग्य आहे. ही कार आधुनिक लिथियम-आयन बॅटरी वापरते, जी जलद चार्जिंग आणि दीर्घ आयुष्य प्रदान करते. याव्यतिरिक्त, कारमध्ये प्रगत इन्फोटेनमेंट सिस्टम, एअर कंडिशनिंग आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि एअरबॅग्ज सारखी सुधारित सुरक्षासंबंधी फिचर्स आहेत.

3/8

वैशिष्ट्ये

Tata Nano Electric 2025 Powerful Range stylish Budget friendly Car Tech News

टाटा नॅनो इलेक्ट्रिक 2025 चार्ज करणे खूप सोपे होईल. कार फास्ट चार्जिंग मोडमध्ये फक्त 60 मिनिटांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. तर सामान्य चार्जरने पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 6 तास लागतात. टाटा मोटर्स देशभरात आपले चार्जिंग नेटवर्क वाढवत आहे. ज्यामुळे ग्राहकांना चार्जिंग सुविधा सहज उपलब्ध होणार आहे. (फोटो सौजन्य-एआय)

4/8

किंमत

Tata Nano Electric 2025 Powerful Range stylish Budget friendly Car Tech News

टाटा नॅनो ईव्हीची अपेक्षित किंमत 5 लाख ते 7 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. ज्यामुळे ती भारतीय बाजारपेठेतील सर्वात परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कारपैकी एक बनते. ही कार 2025 च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत बाजारात उपलब्ध होऊ शकतो. सुरुवातीला ही कार प्रमुख महानगरांमध्ये लाँच केली जाईल. त्यानंतर हळूहळू ती इतर शहरांमध्ये देखील उपलब्ध करून दिली जाईल. (फोटो सौजन्य-एआय)

5/8

पर्यावरणपूरक

Tata Nano Electric 2025 Powerful Range stylish Budget friendly Car Tech News

टाटा मोटर्सने नेहमीच पर्यावरण संरक्षण आणि शाश्वततेला प्राधान्य दिले आहे. टाटा नॅनो इलेक्ट्रिक 2025 चे लाँचिंग हे कंपनीच्या या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या माध्यमातून टाटा मोटर्स प्रदूषण कमी करण्यातच योगदान देत आलंय. यासोबतच तिची किंमत ग्राहकांना परवडणारी आणि तंत्रज्ञान खूप प्रगत आहे.

6/8

काय म्हणतायत ग्राहक?

Tata Nano Electric 2025 Powerful Range stylish Budget friendly Car Tech News

टाटा नॅनो ईव्हीची घोषणा झाल्यापासून ग्राहकांमध्ये उत्साह दिसून येतोय. भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढवण्यात ही कार महत्त्वाची भूमिका बजावेल असे अनेकांना वाटते. परवडणारी किंमत, प्रगत वैशिष्ट्ये आणि टाटाची विश्वासार्हता यामुळे ही कार ग्राहकांमध्ये नक्कीच लोकप्रिय होईल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. (फोटो सौजन्य-एआय)

7/8

ऑटोमोबाईल उद्योगातील महत्त्वाचे पाऊल

Tata Nano Electric 2025 Powerful Range stylish Budget friendly Car Tech News

टाटा नॅनो इलेक्ट्रिक 2025 चे लाँचिंग हे भारतीय ऑटोमोबाईल उद्योगातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. याद्वारे इलेक्ट्रिक वाहनांच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे. तसेच अॅडव्हान्स तंत्रज्ञान परवडणाऱ्या किमतीत कसे उपलब्ध करून देता येईल हे देखील टाटाच्या कारने दाखवून दिले आहे.

8/8

टाटा नॅनो 2025 ची किंमत

Tata Nano Electric 2025 Powerful Range stylish Budget friendly Car Tech News

टाटा नॅनो इलेक्ट्रिक 2025 हा भारतीय ग्राहकांसाठी एक रोमांचक पर्याय म्हणून उदयास येतोय. यात 315 किमीची रेंज, परवडणारी किंमत आणि अॅडव्हान्स वैशिष्ट्य आहेत. ही कार बाजारात नक्कीच धुमाकूळ घालेल. जर तुम्ही परवडणारे आणि पर्यावरणपूरक वाहन शोधत असाल तर टाटा नॅनो ईव्ही तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकते. (फोटो सौजन्य-एआय)