राज्यात मान्सूनचं आगमन पुन्हा लांबलं; आता वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही
राज्यात मान्सूनचं आगमन लांबलं आहे. केरळमध्ये मान्सून अजूनही दाखल झालेला नाही यामुळे महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यास विलंब होणार आहे.
वनिता कांबळे
| Jun 06, 2023, 21:56 PM IST
Monsoon 2023: मान्सूनविषयी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मान्सूनने आत्तापर्यंतचे सर्व अंदाज चुकवले आहेत. राज्यात मान्सूनचं आगमन पुन्हा लांबलं आहे. राज्यात मान्सून दाखल होण्यासाठी आणखी आठभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यामुळे आता वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही.