12 ठिकाणचे पाणी एकत्र होऊन कोसळणारा महाराष्ट्रातील बारामुखी धबधबा; भारतातील एकमेव ठिकाण
महाराष्ट्रातील हा अनोखा धबधबा पाहण्यासाठी संपूर्ण भारतातून पर्यटक येथे येतात. मात्र, या परिसरात दुर्घटना वाढल्याने ग्रामस्थांनी येथे पर्यटकांना मनाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
Nandurbar Baradhara Waterfall: महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये तसेच अनेक ठिकाणी उंचावरुन कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. पावसाळ्यात या धबधब्यांचे सौंदर्य खुलून येते. प्रत्येक धबधब्याचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये असाच एक अनोखा धबधबा आहे. येथे 12 ठिकाणचे पाणी एकत्र होऊन कोसळते. यामुळे हा धबधबा बारामुखी धबधबा नावाने देखील प्रसिद्ध आहे.




