नभ उतरू आलं... दाट धुक्यात हरवलेला जुन्नरमधील मनमोहक वनराई धबधबा

जुन्नरमधील  वनराई धबधबा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. 

Aug 27, 2023, 22:09 PM IST

Junnar Vanrai Waterfall :  राज्याच्या अनेक भागात पावसाने ओढ दिली असली तरी सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील कोपरे मांडवे परिसरात पाऊस बरसत असून या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य हि बहरले आहे,या ठिकाणचा वनराई धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. 

1/6

हिरगार निसर्ग दाट धुके आणि उंचावरून वाहणारा वनराई धबधबा पर्यटकांना आकर्षित करतोय.

2/6

वनराई धबधबा  आळेफाटा पासून 50 आणि पुण्यापासून 125 किलोमीटर तर कोपरे पासून 5 किलोमीटर अंतरावर आहे.   

3/6

कल्याण नगर महामार्गावरून उदापूर गावातून आपण कोपरे मांडवे येथे हा धबधबा आहे.   

4/6

मुंबईवरून या ठिकाणी येण्याचा विचार करत असाल तर कल्याण नगर महामार्गावरून माळशेज घाट मार्गे आपण उदापूर या गावातून कोपरे मांडवे गावातून या वनराई  धबधब्यावर पोहचता येईल. 

5/6

कोपरे गाव लागेल यानंतर ठाणे आणि पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवरती वनराई तसेच देवनाळ धबधबा तसेच यांसारखे अनेक धबधबे आहेत. 

6/6

गर्द झाडीतुन वनराई धबधबा वाहतो. यामुळे वर्षा सहलीसाठी हा धबधबा बेस्ट ठिकाण आहे.