कारच्या सीट बेल्टवरील गुप्त बटण खूप महत्त्वाचं, 99% वाहनचालकांना यांची माहिती नाही

Interesting Facts : कार चालवताना सीट बेल्ट लावणे हे बंधनकारक आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. पण या सीट बेल्टशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी फार कमी लोकांना माहिती आहे.

Mar 13, 2024, 12:56 PM IST
1/7

कारच्या सीट बेल्टवर एक गुप्त बटण असून ते खूप महत्त्वाच असतं. या बटणाबद्दल 99 टक्के कारचालकांनाही माहिती नाही. 

2/7

डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार टिकटॉक अकाउंट @epiccfacts वर नुकताच एक व्हिडीओमध्ये या बटणाबद्दल माहिती सांगितली आहे. 

3/7

सीट बेल्टवर एक बकल असतं हे सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा सीटवर बसलेली व्यक्ती बाजूचा सीट बेल्ट स्वतःकडे ओढतो तेव्हा बकल बाजूला बनवलेल्या खोबणीच्या आत जाते, जिथे ते अडकलं जातं. 

4/7

मात्र जेव्हा बकल काढले जाते तेव्हा ते सैल होते आणि बेल्टवर खाली सरकते हे तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल. 

5/7

ते पुन्हा पुन्हा लावताना गैरसोय होऊ नये म्हणून हे छोटे बटण सीट बेल्टवर देण्यात आलं असतं. 

6/7

हे बटण दबत नाही, मात्र ते बकलला मागे जाण्यापासून प्रतिबंधित करण्यास मदत करतं. शिवाय ते पुढच्या दिशेने असल्यान ते मागे जात नाही. त्यामुळे बांधणाऱ्याला कोणत्याही प्रकारची गैरसोय या बटणामुळे होत नाही. 

7/7

अगदी बोटावर मोजण्या एवढ्या कारचालकांनाही या बटण आणि त्याच्या कार्याबद्दल माहिती आहे.