महाराष्ट्रातलं 'पाण्यातलं मंदिर' थेट पुढल्या वर्षीच दिसणार, कारण..; Photos करतील थक्क

The Submerged Temple Of Maharashtra: खरं तर या मंदिरामुळेच दर उन्हाळ्यात इथं इतिहासप्रेमी, निसर्गप्रेमींची आवर्जून गर्दी होते. यामागील कारणही तसे खास आहे. जाणून घेऊयात महाराष्ट्रातील या अगदीच भन्नाट आणि आगळ्यावेगळ्या पाण्यातल्या मंदिराबद्दल... 

| Jun 20, 2024, 15:40 PM IST
1/13

Submerged Temple Of Maharashtra Palasdev Palasnath Temple

महाराष्ट्रातील एका छोट्याश्या गावात एक मंदिर अगदी जगभरात प्रसिद्ध आहे. हे मंदिर प्रसिद्ध असण्याचं कारण म्हणजे हे मंदिर वर्षातील 12 महिन्यापैकी अगदी काही दिवस पाण्याबाहेर असतं. हे मंदिर कोणं आहे, ते कुठे आहे, त्याचं वैशिष्ट्य काय हे जाणून घेऊयात...

2/13

Submerged Temple Of Maharashtra Palasdev Palasnath Temple

पळसदेव गावाजवळ उजनी धरणाच्या साठ्याचे पाणी कमी झाल्यानंतर पळसनाथ मंदिर दिसले. धरणात मुबलक पाणीसाठा असल्यावर पाण्यामध्ये बुडालेले हे मंदिर पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर दिसू लागते.

3/13

Submerged Temple Of Maharashtra Palasdev Palasnath Temple

जवळपास 12 महिने पाण्यात आणि अगदी काही दिवस पाण्याबाहेर असलेलं हे पळसनाथाचं मंदिर अत्यंत विलोभनीय आणि स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर पाहण्यासाठी दूरुन लोक पळसदेवला येतात.

4/13

Submerged Temple Of Maharashtra Palasdev Palasnath Temple

पळसदेव गावाच्या किनाऱ्यापासून या मंदिरापर्यंत बोटीने जावे लागते. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आल्याचं सांगितलं जातं.  

5/13

Submerged Temple Of Maharashtra Palasdev Palasnath Temple

साधारण बाराव्या शतकामध्ये कल्याण चालुक्य राजवटीत पळसनाथाचे हे मूळ मंदिर बांधले गेले असावे, असं इतिहासतज्ज्ञ सांगतात.  

6/13

Submerged Temple Of Maharashtra Palasdev Palasnath Temple

पळसनाथ मंदिरात सध्या शंकराची पिंड नाही आणि पाण्यामुळे मंदिराची बरीचशी झीज झालेल्याचं मंदिरात गेल्या गेल्या जाणवतं.  

7/13

Submerged Temple Of Maharashtra Palasdev Palasnath Temple

सतत पाण्यात असल्याने आणि अनेक शतकांपासून ऊन, वारा, पाऊस यामुळे मंदिराच्या आवारातील अनेक भिंतींची आणि रचनेचे पडझड झाली असली तरी या मंदिराच्या भिंतीवर कलाकुसर आणि एकंदरितच रचना फारच विलोभनीय आहे.

8/13

Submerged Temple Of Maharashtra Palasdev Palasnath Temple

पळसनाथ मंदिरातील भिंती आणि एकंदरितच रचनेकडे नीट निरखून पाहिल्यावर लक्षातं येतं की मूळ बांधणीनंतर वेळोवेळी या मंदिराची डागडुजी/ जिर्णोद्धार झाला आहे.  

9/13

Submerged Temple Of Maharashtra Palasdev Palasnath Temple

पळसनाथ मंदिराच्या कळसाचीही दुरुस्ती झाल्याचं पाहता क्षणी समजतं. हा कळस नव्याने बांधलेला आहे, असं दिसून येतं.  

10/13

Submerged Temple Of Maharashtra Palasdev Palasnath Temple

पळसनाथ  मंदिरासमोरच किनाऱ्याजवळ एक श्रीरामाचं मंदिरही आहे. या मंदिराच्या भिंतीवर रामायणातील प्रसंग कोरलेले दिसतात.  

11/13

Submerged Temple Of Maharashtra Palasdev Palasnath Temple

राम मंदिर पळसनाथ मंदिराच्या उभारणीनंतर बऱ्याच कालावधीनंतर बांधल्याचं सांगितलं जातं. हे राम मंदिर साधारण पंधराव्या शतकात बांधले असावे, असा एक अंदाज आहे.  

12/13

Submerged Temple Of Maharashtra Palasdev Palasnath Temple

उन्हाळ्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास पळसनाथ मंदिरात पायी जाता येते. पळसदेव गावात इतरही काही मंदिरे आहे.  

13/13

Submerged Temple Of Maharashtra Palasdev Palasnath Temple

पळसनाथ मंदिराच्या बांधणीवरुनच पळसदेव हे गाव बऱ्याच शतकांपूर्वीपासून अस्तित्वात असल्याचं जाणवतं. आता पावसाळ्यात हे मंदिर पाण्याखाली जाईल आणि थेट पुढल्या वर्षी त्यामध्ये प्रवेश करता येईल.