एकटीच्या जीवावर... बॉलिवूडमधील 'या' ब्युटी गर्ल्स आहेत सिंगल पॅरेंट; कोणी आता आहे सासू तर कोणी दोघांची आई

असे सेलिब्रिटी आहेत ज्यांचे लाखो चाहते आहेत. त्यांच्याशी लग्न करण्यासाठी हजोरो मुलांची मोठी लाईन लागली होती. मात्र, त्यांनी पुढे जाणून लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचे वैवाहिक आयुष्य चांगले नव्हते. लग्नाच्या काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला आणि आज त्या सिंगल पेरेंट आहेत.   

Mar 04, 2023, 16:25 PM IST

बॉलिवूड कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आपल्या सगळ्यांना त्यांच्या खासगी आयुष्यासंबंधीत अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. सेलिब्रिटी जसे कॅमेऱ्यासमोर असतात तसेच ते ऑफ कॅमेरा असतात का हे जाणून घेण्यास उस्तुक असतात. आज आपण अशा अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत ज्यांचा घटस्फोट झाला असून आज त्या सिंगल पेरेंट आहेत आणि त्यांच्या मुलांना सांभाळत आहे. या अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये कोणाचं लग्न झालयं तर कोणी आज आहे दोन मुलांची आहे. 

 

1/6

bollywood actress are single parents Sussanne Khan

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) हा सध्या सबा आजादसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हृतिक आणि त्याची पत्नी सुझैन खान (Sussanne Khan) यांचा घटस्फोट होऊन बरीच वर्षे झाली आहेत. आता सुझैन एक सिंगल मदर म्हणून तिच्या दोन्ही मुलांचा सांभाळ करते. 

2/6

bollywood actress are single parents Karisma Kapoor

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करिश्मा कपूरचं लग्न कोणत्या जल्लोषा पेक्षा कमी नव्हतं. करिश्मानं तिचं वैवाहिक आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, काही कारणांमुळे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्याआधी करिश्मा ही बच्चन कुटुंबाची सुन होणार होती. मात्र, त्यातही काही अडचणी आल्या होत्या आणि तिचा आणि अभिषेक बच्चनचा साखरपुडा मोडला होता. 

3/6

bollywood actress are single parents Amrita Singh

अभिनेता सैफ अली खानची पत्नी (Saif Ali Khan) आणि लोकप्रिय अभिनेत्री अमृता सिंग (Amrita Singh) ही देखील सिंगल पेरेंट आहे. सैफसोबतच्या घटस्फोटानंतर अमृता तिच्या दोन्ही मुलांना सांभाळते. 

4/6

bollywood actress are single parents Sanjeeda Shaikh

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री संजीदा शेख (Sanjeeda Shaikh) सुद्धा घटस्फोटीत आहे आणि ती तिच्या मुलीला एकटी सांभाळते. तिनं सुरुवातीला अनेक गोष्टींचा सामना केला. 

5/6

bollywood actress are single parents Neena Gupta

अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) या देखील सिंगल पेरेंट होत्या. त्यांच्या मुलीचे नाव मसाबा गुप्ता (Masaba Gupta) असे आहे. मसाबा ही साऊथ आफ्रिकन क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्ड्स (Vivian Richards) आणि नीना गुप्ता यांची लेक आहे. 

6/6

bollywood actress are single parents Mahima Chaudhry

या लिस्टमध्ये अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhry) चे देखील नाव आहे. महिमा चौधरी 90 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये दिसली. महिमा 2006 साली लग्न बंधनात अडकली होती. दरम्यान, पुढच्या सात वर्षात म्हणजे 2013 मध्ये ते दोघं विभक्त झाले. त्यांना एक मुलगी आहे.