1/6
विराट कोहली
क्रिकेटचे स्वरूप कोणतेही असले तरी त्या स्वरूपात किंग कोहलीचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. या बाबतीत जर आपण आयपीएलच्या सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडूंबद्दल बोललो तर कोहलीचे नाव या यादीत अव्वल स्थानावर आहे. आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्सकडून खेळत, रन मशीन कोहलीने 177 आयपीएल सामन्यांमध्ये 37.84 च्या सरासरीने 131.61 च्या स्ट्राईक रेटसह सर्वाधिक 5 हजार 412 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 5 शतके आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे. कोहलीची सर्वोत्तम धावसंख्या 113 धावा आहे.
2/6
सुरेश रैना
मिस्टर आयपीएल, सुरेश रैना या लीगचा सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि भारताचा सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा सुरेश रैना हा आयपीएलचा एकमेव फलंदाज आहे. ज्याने 2008 पासून 2014 पर्यंत IPL च्या प्रत्येक सीजनमध्ये 400 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. रैनाने 193 आयपीएल सामन्यांमध्ये 33.34 च्या सरासरीने 137.14 च्या स्ट्राईक रेटने 5,368 धावा केल्या आहेत. या काळात रैनाने 1 शतक आणि 38 अर्धशतके झळकावली आहेत. सुरेश रैनाची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 100 अशी आहे. एवढेच नव्हे तर रैनाने 25 विकेटही घेतले आहेत.
3/6
रोहित शर्मा
आयपीएलचं सर्वाधिक 4 वेळा विजेतेपद जिंकणारा मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि भारतीय सलामीवीर रोहित शर्मा या यादीत तिसर्या क्रमांकावर आहे. रोहित फास्ट खेळासाठी जगप्रसिद्ध आहे. अशा परिस्थितीत आयपीएलमध्ये 'हिटमन'ची चमक कमी कशी असेल? रोहितच्या आयपीएल कारकिर्दीत त्याने 188 सामन्यांत 31.60 च्या सरासरीने 130.82 च्या स्ट्राईक रेटसह 4898 धावा केल्या आहेत. रोहितच्या धावांमध्ये त्याचे 1 शतक आणि 36 अर्धशतकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
4/6
महेंद्र सिंह धोनी
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावाचा देखील या यादीत समावेश आहे. माही फलंदाजी करत असताना गोलंदाजांवर वेगळं प्रेशर असतं. धोनीने 190 सामन्यांत 42.20 च्या उत्कृष्ट सरासरीने 137.85 च्या स्ट्राईक रेटने 4 हजार 432 धावा केल्या आहेत. महेंद्रसिंग धोनीची सर्वाधिक धावसंख्या नाबाद 84 रन आहे. माहीने आयपीएल कारकीर्दीत 23 अर्धशतके केली आहेत.
5/6
रॉबिन उथप्पा
भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रॉबिन उथप्पा आयपीएल हंगाम -13 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे. आयपीएलमध्ये रॉबिन उथप्पा याची कामगिरी उत्तम आहे. त्याने आपल्या शानदार खेळाने 177 सामन्यांत 4,411 धावा केल्या आहेत. रॉबिन उथप्पाने 28.83 च्या सरासरीने, 130.50 च्या स्ट्राइक रेट आणि 24 अर्धशतकांसह आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली आहे. रॉबिन उथप्पाचा सर्वोत्तम धावा 87 आहेत. टी -20 फॉर्मेटनुसार उथप्पाची आकडेवारी चांगली आहे.
6/6