129 कोटींचा मालक, 14 वर्षांमध्ये दिला नाही एकही हिट, ओळखलं का?

बॉलिवूडमधील या अभिनेत्याने 14 वर्षांपासून एकही हिट चित्रपट दिला नाहीये. त्याचे सर्व चित्रपट फ्लॉप ठरले असले तरी तो आज 129 कोटींचा मालक आहे. 

Soneshwar Patil | Feb 12, 2025, 18:04 PM IST
1/7

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांच्या करिअरमध्ये चढ-उतार राहिला आहे. मात्र, एक असा अभिनेता आहे, ज्याने आतापर्यंत 14 वर्षांमध्ये एकही हिट चित्रपट दिला नाही. 

2/7

आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाबद्दल सांगणार आहोत. ज्याला अनेक वेळा अपयशाचा सामना करावा लागला. मात्र, आज तो 129 कोटींचा मालक आहे. 

3/7

बॉलिवूडमधील या अभिनेत्याचे नाव हिमेश रेशमिया आहे. नुकताच त्याचा 'बॅड अ‍ॅस रवी कुमार' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे बजेट 20 कोटी रुपये इतके होते. 

4/7

हा चित्रपट 7 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त 4 दिवसांमध्ये 6.75 कोटींची कमाई केली. त्याचा हा चित्रपट देखील फ्लॉप ठरला आहे. 

5/7

अभिनेत्याने 2007 मध्ये 'आपका सुरूर' या चित्रपटातून अभिनय कारकि‍र्दीला सुरुवात केली होती. ज्यामध्ये हिमेश रेशमियासोबत हंसिका मोटवानी दिसली होती. 

6/7

हिमेशने आतापर्यंत अनेक गाणी गायली ज्यामध्ये सर्व हिट ठरली. परंतु, 14 वर्षांमध्ये त्याने एकही हिट चित्रपट दिला नाही. आतापर्यंत त्याने 9 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

7/7

तरी देखील हिमेश रेशमिया हा इंडस्ट्रीमधील एक लोकप्रिय अभिनेता आहे. मिडिया रिपोर्टनुसार, हिमेश रेशमियाची एकूण संपत्ती 129 कोटी रुपये आहे. एका गाण्यासाठी तो 15 लाख रुपये घेतो.