'हे' 5 भारतीय क्रिकेटपटू वयाने त्यांच्या पत्नींपेक्षा आहेत लहान, यादीत आहे सचिन ते कोहलीचा समावेश

भारताचे अनेक स्टार क्रिकेटर्स आहेत. ज्यांच्या बायका त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत. या यादीत भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर ते विराट कोहली यांच्या नावांचा समावेश आहे.

तेजश्री गायकवाड | Feb 12, 2025, 15:59 PM IST

भारताचे अनेक स्टार क्रिकेटर्स आहेत. ज्यांच्या बायका त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत. या यादीत भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर ते विराट कोहली यांच्या नावांचा समावेश आहे.

1/7

नेहमीच क्रिकेट विश्वाबद्दल लोकांना फार उत्सुकता असते. क्रिकेटर्स आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल नेहमीच सर्च केलं जात.   

2/7

भारताचे अनेक स्टार क्रिकेटर्स आहेत. ज्यांच्या बायका त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत. या यादीत भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर ते विराट कोहली यांच्या नावांचा समावेश आहे.

3/7

सचिन तेंडुलकर-अंजली तेंडुलकर

क्रिकेटचा गॉड म्हणून जगात प्रसिद्ध असलेल्या सचिन तेंडुलकरने अंजलीसोबत लग्न केले. अंजली सचिनपेक्षा 6 वर्षांनी मोठी होती. अंजलीने व्यवसायाने डॉक्टर म्हणून काम केले.  

4/7

विराट कोहली-अनुष्का शर्मा

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने बॉलीवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केले आहे. कोहली हा त्याच्या पत्नीपेक्षा वयाने लहान आहे. अनुष्का विराट कोहलीपेक्षा 6 महिन्यांनी मोठी आहे.  

5/7

व्यंकटेश प्रसाद-जयंती

भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादने घटस्फोटित मुलीशी लग्न केले आहे. 1996 मध्ये त्यांनी जयंतीसोबत लग्न केले. जयंती ही व्यंकटेश प्रसाद यांच्यापेक्षा 9 वर्षांनी मोठी आहे.

6/7

रॉबिन उथप्पा-शीतल गौतम

या यादीत भारताचा माजी सलामीवीर फलंदाज रॉबिन उथप्पाही  समावेश आहे. रॉबिनचे लग्न शीतल गौतमशी झाले आहे. शीतल उथप्पापेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे. शीतल ही टेनिसपटू राहिली आहे.

7/7

सुरेश रैना-प्रियांका चौधरी

भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाचे लग्न प्रियंका चौधरीसोबत झाले. प्रियांका रैनापेक्षा 5 महिने 9 दिवसांनी मोठी आहे. दोघांनी 2015 मध्ये लग्न केले.