Love Story : एका विनोदाने सुरु झाली कतरिना-विकीची प्रेमकहाणी, थेट लग्नापर्यंत कशी पोहोचली?

व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या प्रेमकहाणीचा किस्सा सांगणार आहोत. 

Soneshwar Patil | Feb 12, 2025, 12:29 PM IST
1/7

बॉलिवूडमध्ये अनेक प्रेमकथा पाहायला मिळतात. ज्यामध्ये काही प्रेमकथांचा शेवट दुःखद झाला, तर काही अशा आहेत, ज्या सात लग्नापर्यंत पोहोचल्या आणि प्रेमींसाठीही एक उदाहरण बनल्या. 

2/7

अशीच एक प्रेमकहाणी म्हणजे कतरिना कैफ आणि विकी कौशलची. विनोदाने सुरू झालेले नाते आयुष्यभराच्या सहवासात कसे बदलले. हे आपण आज जाणून घेणार आहोत.

3/7

कतरिना आणि विकीने त्यांचे नाते खूप गुप्त ठेवले होते. दोघे कधीच सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले नाहीत. मात्र, 2021 मध्ये त्यांनी अचानक त्यांच्या लग्नाची घोषणा केली. थाटामाटात लग्न देखील केले. 

4/7

खरंतर, दोघांच्या प्रेमकहाणीला करण जोहरच्या 'चॅट शो कॉफी विथ करण'मधून एका विनोदाने सुरु झाली. यावेळी करण जोहरने सांगितले होते की, कतरिनाला विकी कौशलसोबत एका चित्रपटात काम करायचं आहे. तिला वाटते की दोघांची जोडी खूप छान दिसेल. 

5/7

करण जोहरचा हा प्रश्न ऐकून विकी कौशल खूप लाजला होता. त्याने बेशुद्ध होण्याचे नाटक केले होते. यानंतर दोघेही एकमेकांना गुपचूप डेट करत होते. परंतु, त्यांचे नाते उघड झालेच. 

6/7

त्यानंतर एका शोमध्ये देखील विकी कौशलने कतरिनाला प्रपोज केले होते. त्यावेळी सलमान खान देखील उपस्थित होता. सर्वांसमोर विकी कौशलने कतरिनाला विचारले की, लग्नाचा सिजन सुरु आहे, तू माझ्यासारख्या चांगल्या मुलाशी लग्न का करत नाहीस. 

7/7

काही दिवसांनंतर विकी कौशलचा हा विनोद प्रत्यक्षात आला. दोघांनी राजस्थानमध्ये थाटामाटात लग्न केले. दोघेही आता आनंदी वैवाहिक जीवन जगत आहेत.