रणवीर अलाहाबादियाप्रमाणेच 'या' प्रसिद्ध युट्यूबर्सना कायदेशीर अडचणींना का सामोरे जावे लागले? पाहूयात सविस्तर

सोशल मीडियावर वर्चस्व गाजवणारे युट्यूबर्स दररोज लोकप्रियता मिळवत असले तरी त्यांच्यावर अनेकदा कायदेशीर वाद आणि वादग्रस्त घटनांमुळे टीका केली जाते. रणवीर अलाहाबादीया प्रमाणेचं अनेक युट्यूबर्स आहेत ज्यांचावर अनेक आरोप झाले आहेत. 

Intern | Feb 12, 2025, 11:14 AM IST
1/7

अलीकडेच, 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमधील अश्लील वक्तव्यांमुळे रणवीर इलाहाबादिया, समय रैना आणि अपूर्वा मखीजा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. रणवीर प्रमाणे आधी कोण-कोणत्या युट्यूबर्सवर वादग्रस्त घटनांमुळे टीका केली गेली आणि गुन्हा दाखल झाले. जाणून घेऊयात सविस्तर 

2/7

एल्विश यादव:

'ओटीटी बिग बॉस 2' चा विजेता आणि युट्यूबर एल्विश यादवने विषारी सापांची तस्करी केली आणि बेकायदेशीर रेव्ह पार्ट्या आयोजित केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात जावे लागले. यावेळी त्याच्यावर असंख्य गंभीर आरोप होते, ज्यामुळे त्याच्या कारकीर्दीला धक्का लागला. 

3/7

मुनावर फारुकी:

स्टँड अप कॉमेडियन मुनावर फारुकीला 2021 मध्ये एका कार्यक्रमादरम्यान धार्मिक भावना दुखावल्याबद्दल 37 दिवसांची शिक्षा झाली. त्याच्यावर आरोप होते की त्याने देव-देवतांचा अपमान करत लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या. त्याला तुरुंगातही राहावे लागले होते आणि यामुळे त्याला दीर्घ काळ पब्लिक स्पेसमधून बाहेर राहावे लागले.

4/7

कॅरीमिनाटी:

कॅरीमिनाटी, ज्याला युट्यूबवरील रोस्ट व्हिडीओंमुळे मोठा प्रेक्षकवर्ग मिळाला आहे, त्याच्यावर महिलांविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पण्या आणि अपशब्द वापरण्याचा आरोप झाला. त्याच्या व्हिडीओंमधील भाषेवर टीका केली गेली होती आणि काही व्हिडीओंमुळे वाद निर्माण झाले होते. यामुळे त्याला सार्वजनिकपणे माफी मागावी लागली.

5/7

खान सर:

बिहारचे प्रसिद्ध शिक्षक आणि युट्यूबर खान सर, जो शिक्षणाच्या क्षेत्रात एक आघाडीचे नाव आहे, त्याला  विद्यार्थ्यांच्या निषेधादरम्यान हिंसाचार भडकवण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही लोकांचा आरोप होता की त्याने विद्यार्थ्यांना हिंसक वागणूक देण्यास उत्तेजन दिले आणि यामुळे शिक्षण क्षेत्रात काही वाद निर्माण झाले.  

6/7

अरमान मलिक:

इंटरनेटवरील सेन्सेशन अरमान मलिकने दोन लग्न करुन मोठा धक्का दिला आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो चर्चेत आला. त्याच्यावर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता, ज्यामुळे त्याच्या लोकप्रियतेला धक्का बसला होता. त्यानंतर, या प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरू झाली.  

7/7

कायदेशीर वाद आणि त्याचा प्रभाव युट्यूबर्सवर

हे सर्व युट्यूबर्स त्यांच्या व्यवसायात असले तरी या कायदेशीर अडचणींमुळे त्यांची कारकीर्द प्रभावित झाली आहे. या वादांमुळे त्यांना वाईट रीतीने ओळखले जात आहे. अनेक युट्यूबर्स, जे प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते, त्यांच्यावर दबाव येत आहे, कारण त्यांचा शब्द आणि कृतींवर आता बरीच कडक नजर आहे. यापुढे, युट्यूबर्सने सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर आपली जबाबदारी आणि शब्दांची निवड चांगल्या प्रकारे विचार करून केली पाहिजे, कारण कायदेशीर अडचणी त्यांचा इमेज आणि करिअर खराब करू शकतात.