400गाड्यांचा मालक, अब्जावतीची संपत्ती! 'हा' आहे देशातील सर्वात श्रीमंत न्हावी; त्याच्यापुढे अब्जाधीशांची संपत्ती पडेल फिकी

आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात श्रीमंत न्हाव्याबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या यशाची कहाणी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. 

तेजश्री गायकवाड | Feb 12, 2025, 13:53 PM IST

आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात श्रीमंत न्हाव्याबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या यशाची कहाणी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. 

1/7

कहाणी ऐकून तुम्ही थक्क व्हाल

असे म्हटले जाते की, कोणत्याही व्यक्तीमध्ये यशस्वी होण्याची इच्छा असेल तर तो काहीही करू शकतो. आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात श्रीमंत न्हाव्याबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या यशाची कहाणी  ऐकून तुम्ही थक्क व्हाल. 

2/7

लहानपणापासून अनेक अडचणींना दिले तोंड

ते लहानपणापासून अनेक अडचणींना तोंड देत मोठे झाले. आई-वडिलांच्या मृत्यूच्या वेळी ते खूपच लहान होते आणि त्याचे कुटुंब गरिबीशी झुंजत होते.  मात्र, रमेशने हार मानली नाही आणि आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ते न्हावी झाला.

3/7

भारतातील सर्वात श्रीमंत न्हावी कोण आहे?

बेंगळुरूमध्ये राहायला असलेले रमेश बाबू हे भारतातील सर्वात श्रीमंत न्हावी आहेत. 

4/7

सर्वात प्रतिष्ठित न्हावी

रमेश हे केवळ सर्वात श्रीमंत न्हावीपैकी एक नाहीत तर ते देशातील सर्वात प्रतिष्ठित न्हावीपैकी एक आहेत. इतकेच नाही तर रमेश बाबूकडे अनेक आलिशान गाड्यांचं कलेक्शन आहे ज्यात रोल्स रॉयस घोस्ट, मर्सिडीज-बेंझ, ऑडी इत्यादी गाड्या आहेत.   

5/7

जिंकायचे होते जग

खरे तर रमेशबाबूंना नेहमीच जग जिंकायचे होते. रमेश आपल्या कामात स्वतःला झोकून दिले होते. त्यांनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक गोष्टी केल्या, सर्वप्रथम त्याने 1994 मध्ये मारुती ओम्नी खरेदी केली आणि नंतर त्यांनी गाडी भाड्याने देण्याचा व्यवसाय वेगाने वाढवला.

6/7

400 पेक्षा जास्त आलिशान कार

कोणालाही हे जाणून आश्चर्य वाटेल पण रमेश बाबूकडे 400 पेक्षा जास्त आलिशान कार आहेत. त्यानी कार खरेदी करून व्यवसाय सुरू केला आणि पुन्हा कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांनी मर्सिडीज ई क्लास सेडान, रोल्स रॉयस घोस्ट, जग्वार, मर्सिडीज मेबॅक, बीएमडब्ल्यू आणि इतर अनेक आलिशान कार खरेदी केल्या.

7/7

सलूनमध्येच घालवतात वेळ

एवढ्या मोठ्या यशानंतरही ते आपल्या मुळांना विसरले नाहीत. ते आजही आपल्या मुळाशी जोडलेले आहेत. खरं तर, इतका श्रीमंत आणि अब्जाधीश असूनही ते त्यांच्या सलूनमध्ये बराच वेळ घालवतो. ते स्वत: त्याच्या ग्राहकांना स्टाइल करून आजही त्याच्यातील न्हावी जिवंत ठेवतात.