Pariksha Pe Charcha: दीपिका पादुकोणने शेअर केला बालपणीचा किस्सा, विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याबाबत दिला सल्ला

'परीक्षा पे चर्चा'च्या 8 व्या आवृत्तीत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने मुलांना तणावापासून कसे दूर ठेवावे याबद्दल बोलत असताना तिचा लहानपणीचा एक प्रसंग शेअर केलाय.

Soneshwar Patil | Feb 12, 2025, 13:30 PM IST
1/7

अभिनेत्री दीपिका पदुकोण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात दिसली होती. यावेळी तिने विद्यार्थ्यांसोबत तिचे वैयक्तिक अनुभव शेअर केले.   

2/7

याच कार्यक्रमातील व्हिडिओ तिने तिच्या सोशल मीडियावरही शेअर केला आहे. यासोबतच तिने मानसिक आरोग्य आणि परीक्षेदरम्यान ताणतणावाचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दलही सांगितले आहे. 

3/7

या चर्चेदरम्यान दीपिकाने तिच्या बालपणाबद्दल माहिती दिली. तिला खेळाकडे जास्त कल होता. ती लहानपणी खूप खोडकर होती. ती नेहमीच सोफा, टेबल आणि खुर्च्यांवर उड्या मारत असायची.

4/7

तिला अभ्यास सोडून इतर उपक्रमांमध्ये जास्त रस होता. त्याच वेळी अभिनेत्रीने सांगितले की ती सतत काम करत राहिली आणि एके दिवशी ती बेशुद्ध पडली. 

5/7

काही काळानंतर तिला जाणवले की ती नैराश्याने ग्रस्त आहे. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःवर कोणताही ताण घेऊ नये असं तिने सांगितले. 

6/7

त्यानंतर दीपिकाने मोदींचे आभार मानले. त्याचबरोबर तिने विद्यार्थ्यांना सांगितले की,ताणतणावाबद्दल पालकांशी आणि शिक्षकांशी बोला.

7/7

 तणावाचे कारण विश्वासू व्यक्तीसोबत शेअर करा. तणावाचा सामना करण्यासाठी ध्यानधारणा आणि व्यायाम करा असं तिने सांगितले.