'हे' भारतीय क्रिकेटर्स स्वत:च्या Private Jets ने फिरतात; एखाद्या राजा महाराजा प्रमाणे आयुष्य जगतात

हे भारतीय क्रिकेटर स्वत:च्या खासगी विमानाने प्रवास करतात.कोण आहेत हे खेळाडू जाणून घेऊया.

वनिता कांबळे | Aug 11, 2024, 22:03 PM IST

Famous Cricketers Own Private Jets : भारताचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला तरी भारतात जितकं क्रिकेट या खेळाला प्रेम आणि महत्व दिल जातं तेवढं नक्कीच इतकं कुठल्या खेळाला दिल जात नाही. भारताचे बीसीसीआय हे क्रिकेट बोर्ड सद्यस्थितीत जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी खेळणाऱ्या खेळाडूंनाही मोठया प्रमाणात मॅच फी दिली जाते. तसेच अनेक ब्रँड्सच्या प्रमोशनच्या माध्यमातून हे खेळाडू कोट्यावधी रुपये कमावतात. अनेकांकडे महागड्या कार आहेत.  पण, असे काही मोजकेच भारतीय खेळाडू आहेत ज्यांच्याकडे त्यांचे स्वत:च्या खासगी विमान (Private Jet) आहे.

1/5

हार्दिक पांड्या

हार्दिक पांड्या हा भारताचा अष्टपैलू खेळाडू सध्या भारतीय संघाचे T20 सामन्यांत नेतृत्व करत आहे. हार्दिक पांंड्या देखील भारतातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्यांपैकी एक खेळाडू आहे. त्याला अनेक महागड्या कार्सची आवड आहे.  त्याच्याकडे सुमारे 15 ते 30 कोटी इतक्या किंमतीच खाजगी जेट आहे.  

2/5

महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी याला कॅप्टन कुल म्हणूनही ओळखले जाते. भारतीय संघाच्या कर्णधारपदी असताना त्याने संघाला अनेक स्पर्धेत विजय मिळवून दिला आहे. जगातील श्रीमंत खेळाडूंमध्ये महेंद्रसिंग धोनीची गणना केली जाते. धोनीला कार आणि बाईक्सची प्रचंड आवड आहे. तसेच त्याच्याकडे 12.3 दशलक्ष डॉलरचे खासगी जेट आहे.

3/5

विराट कोहली

विराट कोहली सध्याचा सर्वात सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. धुव्वादार फलंदाजीने त्याने क्रिकेट विश्वात आपल्या नावाची विशेष छाप उमटवली आहे. जाहिरातींसाठी सर्वात जास्त मानधन घेणारा क्रिकेट विश्वातील एकमेव खेळाडू आहे. त्याच्याकडे $6.1 दशलक्ष इतक्या किंमतीच खासगी जेट आहे.  

4/5

सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाते. आपल्या फलंदाजीने त्याने क्रिकेट विश्वात अनेक विशाल विक्रमांची नोंद केली आहे. सर्व फॉरमॅट मध्ये 100 शतक ठोकणारा तो एकमेव खेळाडू आहे. सचिनकडे देखील स्वत:चे खाजगी जेट आहे.  

5/5

कपिल देव

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू व 1983 क्रिकेट विश्वचषकाचा हिरो म्हणून संबोधल्या जाणाऱ्या कपिल देव याच्याकडे त्याचे स्वत:चे प्रायव्हेट जेट आहे. कपिल देव यांनी त्यांच्या कारकिर्दीत भरपूर कमाई केली. हे पहिले भारतीय खेळाडू आहेत. ज्याच्याकडे खासगी जेट आहे.