आधी खूपच गरीब होते हे क्रिकेटर्स, खेळानं बनवलं करोडपती!

किस्मत बदल ते देर नही लगती... जिद्द आणि अपार मेहनत घेण्याची तयारी असेल तर यश आपल्याकडे चालून येते. असेच काही भारतीय खेळाडू आहेत. ज्यांनी अत्यंत गरीबीत आयुष्य काढले पण आता ते ऐशोआरामाचे आयुष्य जगत आहेत.  

Aug 10, 2023, 18:44 PM IST

India Richest Cricketer 2023 :  भारतात क्रिकेट या खेळाची खूपच क्रेझ आहे. भारतात क्रिकेट खेळाडू आणि फिल्म स्टार यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला जातो. भारताचे बीसीसीआय हे सद्यस्थितीतील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून होणाऱ्या अनेक स्पर्धांमध्ये खेळाडूंना बक्कळ मानधन दिले. तसेच जगभरात प्रसिद्ध असलेल्या आयपीएलमध्ये अनेक भारतीय खेळाडूंना कोट्यावधी रुपयांचे मांधन मिळते. त्यामुळेच गरीबीतून वर आलेले अनेक भारतीय खेळाडू त्यांच्या मेहनतीच्या जोरावर कोट्यावधी रुपये कमवत आहेत. भारतात असे  असे काही क्रकिकेट आहेत जे आधी खूपच गरीब होते. मात्र, खेळाने त्यांना करोडपची बनवलं आहे.

1/6

महेंद्र सिंह धोनी (mahendra singh dhoni)

पद्मभूषण, पद्मश्री आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारप्राप्त क्रिकेटपटू  महेंद्रसिंग धोनी याला ओळखत नाही असा एकही व्यक्ती  सापडणार.  झारखंडच्या रांची येथे जन्मलेल्या धोनीहे मेहनीत्या जोरावर यश मिळवले आहे.  रेल्वेची नोकरी सोडून त्याने क्रिकेट विश्वास आपले वेगळे स्थान निर्माण केले. 

2/6

हार्दिक पांड्या आणि क्रुणाल पांड्या (hardik pandya and krunal pandya )

पंड्या ब्रदर्सने क्रिकेच विश्वास आपली वेगळी ओळख निर्माण केलेय.  हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या सध्या एकदम अलिशान आयुष्य जगत आहेत. यांच्याकडे क्रिकेट किटसाठी पैसे नव्हते. मात्र, क्रिकेट या खेळानेच आता त्यांच आयुष्य बदललं आहे. 

3/6

रवींद्र जडेजा (ravindra jadeja)

रवींद्र जडेजा हा ‘सर रवींद्र जडेजा’ या नावाने ओळखला जातो. रवींद्र जडेजा हा मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आला. त्याचे वडील अनिरुद्धसिंह जडेजा आर्मीमध्ये होते. जखमी झाल्याने त्यांना सैन्यातील नोकरी सोडावी लागली होती. यानंतर त्यांना अत्यंत हलाखीत आयुष्य काढवे लागले. मात्र, क्रिकेटमधील दमदार कामगिकीमुळे जडेजा याचे आयुष्यच बदलले आहे. 

4/6

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)

6 डिसेंबर 1993 रोजी गुजरात मधील अहमदाबाद येथे जसप्रीत जसबीरसिंह बुमराह याचा जन्म झाला. बुमराह  हा  सर्व फॉरमॅटमध्ये खेळणारा खेळाडू आहे. 140-145 किमी प्रतितासच्या स्पीडने तो बॉलिंग करतो. एकेकाळी बुमराह शूज आणि कपडे घेण्यासाठीही पैसे नव्हते. मात्र, आता तो कोट्यवधीच्या मालमत्तेचा मालक आहे.बुमराह आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. 

5/6

मोहम्मद सिराज (mohammed siraj )

आयपीएलने मोहम्मद सिराजचे आयुष्यच बदलून टाकले. सिराजचे वडील ऑटो रिक्षा चालवायचे. एकी काही त्याने हलाखीचे जीवन काढले. मात्र, आता तो करोडपती झाला आहे. 

6/6

टी नटराजन (T Natrajan)

वयाच्या 20 व्या वर्षी खऱ्या अर्थाने टी नटराजन याच्या क्रिकेट खेळण्याला सुरुवात झाली. तो एक बेस्ट  गोलंदाज आहे. तो एका षटकात सहा यॉर्कर टाकू शकतो. नटराजन आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळतो.