अंडर १९ वर्ल्ड कप फायनलमध्ये या खेळाडूंवर असेल नजर

Jan 31, 2018, 22:37 PM IST
1/6

पृथ्वी शॉ

पृथ्वी शॉ

भारताचा कॅप्टन पृथ्वी शॉनं भारताला आतापर्यंतच्या सगळ्या मॅचमध्ये चांगली सुरुवात करून दिली आहे. पृथ्वीनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये ९४, पपुआ न्यू गिनीविरुद्ध दुसऱ्या मॅचमध्ये नाबाद ५७, बांग्लादेशविरुद्ध ४९ आणि पाकिस्तानविरुद्ध ४१ रन्स बनवले होते. 

2/6

शुभमन गिल

शुभमन गिल

भारताचा उपकर्णधार शुभमन गिलसाठी ही स्पर्धा शानदार राहिली आहे. शुभमननं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये ६३, झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद ९०, बांग्लादेशविरुद्ध ८६ आणि पाकिस्तानविरुद्ध नाबाद १०२ रन्सची खेळी केली होती. 

3/6

कमलेश नागरकोटी

कमलेश नागरकोटी

पहिल्याच मॅचमध्ये कमलेश नागरकोटीनं ताशी १४५ किमीनं बॉलिंग करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये नागरकोटीनं ७ ओव्हरमध्ये २९ रन्स देऊन ३ विकेट घेतल्या. इतर मॅचमध्ये नागरकोटीनं विकेट घेतल्या नसल्या तरी विरोधी टीममध्ये नागरकोटीनं त्याच्या जलद बॉलिंगनं घाबरवून टाकलं आहे. 

4/6

शिवम मावी

शिवम मावी

शिवम मावीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३, पपुआ न्यू गिनीविरुद्ध २ आणि बांग्लादेशविरुद्ध २ विकेट घेतल्या आहेत. 

5/6

अनुकूल रॉय

अनुकूल रॉय

झिम्बाब्वेविरुद्धच्या मॅचमध्ये अनुकूल रॉयनं ७.१ ओव्हरमध्ये २० रन्स देऊन ४ विकेट घेतल्या. पपुआ न्यू गिनीविरुद्धच्या मॅचमध्ये अनुकूलनं ५ विकेट घेतल्या होत्या. 

6/6

मनजोत कारला

मनजोत कारला

ग्रुप मॅचमध्ये मनजोत कालराची बॅट फारशी तळपली नाही. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये मनजोतनं ९९ बॉल्समध्ये ८६ रन्स केल्या. पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये मनजोतनं ४७ रन्स केल्या होत्या.