Mutual Fund मध्ये गुंतवणूक करताना लक्षात ठेवा 'या' 5 गोष्टी; नाहीतर होईल मोठं नुकसान

Best Mutual Fund: कोणत्याही म्यूच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवण्याआधी काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या. लोअर एक्सपान्सेस रेशो असणाऱ्या म्यूच्युअल फंडांचीच गुंतवणूक करण्यासाठी निवड करावी. जाणून घेऊयात म्यूच्युअल फंड गुंतवणुकीसंदर्भातील काही खास टीप्स...

Mar 02, 2023, 21:48 PM IST
1/5

mutual fund

Top Mutual Fund: म्यूच्युअल फंडामध्ये अशा प्रकारची एक गुंतवणूक आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या गुंतवणूकदारांकडून पैसे मिळवून ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवले जातात. हा फंड गुंतवणुकीच्या उद्देशांच्या आधारे स्टॉक, फिक्स्ड इन्कम गुंतवणूक किंवा मिश्र अशापद्धतीचा असतो. इक्विटी आणि इक्विटीसंबंधित उपकरणं, सरकार आणि कॉर्परेट बॉण्ड्स, मनी मार्केट गुंतवणूक, गोल्ड आणि रिअल इस्टेटमध्ये इक्विटी आणि इक्विटी-संबंधित उपकरणांमध्ये गुंतवणूक करणारे फंड बाजारात उपलब्ध आङेत. फंड मॅनेजर यासंदर्भातील नियंत्रण करतात.

2/5

mutual fund

कोणत्याही म्यूच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणं फार आवश्यक आहे. लोअर एक्सपेन्स रेशो असलेल्या म्यूच्युअल फंडांची निवड गुंतवणुकीसाठी करावी.

3/5

mutual fund

म्यूच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना टॅक्ससंदर्भातही काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक असतं. इक्विटी, कर्ज आणि संतुलित म्यूच्युअल फंड योजनांवरील टॅक्ससंदर्भात सतर्क असणं आवश्यक आहे. हे सर्व टॅक्स लक्षात घेऊनच गुंतवणुकीसाठी योग्य ते म्यूच्युअल फंड निवडावेत.

4/5

mutual fund

गुंतवणुकीतून काय अपेक्षित आहे हे निर्णधारित करुन त्यानुसार म्यूच्युअल फंडांची निवड करावी किंवा पोर्टफोलियो निवडावेत. तसेच हे ही पाहणे आवश्यक आहे की त्या म्यूच्युअल फंडात कोणत्या कंपन्यांचा समावेश आहे. असं केल्यास पैसा नेमका कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आला आहे याची कल्पना येते.

5/5

mutual fund

अनेकदा म्यूच्युअल फंडांवर आधारित कर्जही दिलं जातं. अशाच पद्धतीचे म्यूच्युअल फंडही निवडता येतात. म्यूच्युअल फंडाचा अॅक्टीव्ह लोड किती आहे हे तपासून पहावे. गुंतवणुकीतून बाहेर पडताना एएमसीच्या माध्यमातून आकारण्यात आलेली रक्कम किती आहे हे तपासणे फायद्याचे ठरते.