डेब्यू आधी अशा दिसायच्या 'या' 6 अभिनेत्री; कोणाला PCOD तर कोणाला काय... फिटनेस पाहून तुम्हाला होईल आश्चर्य

बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या फिटनेससाठी ओळखले जातात. मात्र, त्यांचा फिटनेस मेनटन ठेवण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागते आणि ती फक्त अभिनय क्षेत्रात आल्यानंतरच असते असं नाही. तर त्या आधी देखील त्यांना त्यांच्या फिटनेसकडे लक्ष द्यावं लागतं. पण काही कलाकारांनी चित्रपटसृष्टीत येण्यासाठी फिटनेसकडे इतकं लक्ष दिलं की त्यांची ट्रान्सफॉरमेशन पाहुन तुम्हालाही आश्चर्य होईल. 

Diksha Patil | Oct 26, 2024, 17:51 PM IST
1/7

आज आपण अशा काही कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत जे अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी खूप लठ्ठ होते. फक्त अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी त्यांनी किती वजन कमी केलं हे पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे.

2/7

भूमि पेडनेकर

भूमि पेडनेकरनं 'दम लगा के हईशा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात भूमिनं वैवाहिक महिलेची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर तिनं 33 किलो वजन कमी केलं केलं होतं. 

3/7

सोनाक्षी सिन्हा

सोनाश्री सिन्हानं 'दबंग' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याआधी ती खूप हेल्दी होती आणि तिनं चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यााठी 30 किलो वजन कमी केलं. 

4/7

सोनम कपूर

सोनम कपूरनं 2007 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या 'सांवरिया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 19 वर्षांची असताना सोनम ही 89 किलोची होती. त्यानंतर तिनं 35 किलो वजन कमी केलं. 

5/7

सारा अली खान

सारा अली खाननं 'कॉफी विद करण' मध्ये खुलासा केला होता की तिला पीसीओडीची समस्या आहे. तर केदारनाथ या चित्रपटातून प्रवेश करण्यासाठी तब्बल 40 किलो वजन कमी केलं होतं. 

6/7

परिणीति चोप्रा

'लेडीज वर्सेज रिकी बहल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी परिणीति चोप्रानं खूप वजन कमी केलं. 

7/7

फरदीन खान

फरदीन खान बराच काळ चित्रपटसृष्टीपासून लांब होता. त्यानंतर तब्बल 14 वर्षांनी 'हीरामंडीः द डायमंड बाजार' या सीरिजमधून पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याआधी त्यानं 18 किलो वजन कमी केलं होतं.