ICC World Cup 2011: हाच तो दिवस, 12 वर्षापूर्वी जेव्हा टीम इंडियाने World Cup जिंकला; कुठंय ते प्लेयर्स?

12 years Of ICC World Cup 2011: टीम इंडियाने 2011 साली वर्ल्ड कप फायनलमध्ये दणक्यात विजय नोंदवला. अखेरच्या सामन्यात श्रीलंका धुळ चारत भारताने (IND vs SL Final) वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. या वर्ल्ड कपमधील खेळाडू आत्ता काय करतात? माहितीये का?

Apr 02, 2023, 16:56 PM IST

ICC World Cup 2011: भारताच्या गल्लोगल्लीत शांतता पसरली होती अन् टीव्हीसमोर घोळकाच्या घोळका. श्रीलंका आणि भारत यांच्यात फायनल सामना सुरू होता. युवराज सिंह आणि महेंद्रसिंह धोनी ही स्टार जोडी मैदानात होती. त्याचवेळी धोनीने कुलसेकराच्या चेंडूवर सिक्स मारला आणि एकच जल्लोष सुरू झाला. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2011 साली वर्ल्ड कप फायनलमध्ये दणक्यात विजय नोंदवला. अखेरच्या सामन्यात श्रीलंका धुळ चारत भारताने (IND vs SL Final) वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. या वर्ल्ड कपमधील खेळाडू आत्ता काय करतात? माहितीये का?

1/11

सचिन तेंडूलकर  2011 चा वर्ल्ड कप सचिनसाठी खास राहिला. सचिनने एकूण सहा विश्वचषक खेळले होते, 2011 साली भारताला विश्वविजेता बनवण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण झालं. 3 डिसेंबर 2012 रोजी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि त्यानंतर 2013 मध्ये त्याने कसोटी फॉरमॅटलाही अलविदा केला.

2/11

वीरेंद्र सेहवाग 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये  8 सामन्यांत 380 धावा करून टीम इंडियाला धमाकेदार सुरूवात करून दिली. सेहवागने बांग्लादेशवर केलेला हल्लाबोल आजही सर्वांना आठवतो. 2015 साली क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली.

3/11

गौतम गंभीर गौतम गंभीरने 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये 9 सामन्यांत केवळ 393 धावा केल्या. फायनलच्या सामन्यात सचिन सेहवाग बाद झाल्यावर गंभीरने 97 धावांची संयमी खेळी केली होती. आता गंभीरने 2018 मध्ये निवृत्ती घेतली आणि तो आयपीएलमधील लखनऊच्या संघासाठी कोचिंग करतो.

4/11

विराट कोहली  फक्त 22 वर्षांच्या विराटसाठी हा वर्ल्ड कप कारकीर्दीतील एक टर्निंग पॉइंट ठरला. फायनलमध्ये कोहलीने श्रीलंकेविरुद्ध 49 चेंडूत 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती. आत्ताही तो टीम इंडियासाठी खेळतो.

5/11

युवराज सिंह वर्ल्ड कप 2011 चा विषय चाललाय आणि युवराजचं नाव येणार नाही, असं कधीच होऊ शकत नाही. युवराज सिंहने त्याच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर भारताला वर्ल्ड कर जिंकून दिला.  9 सामन्यात 380 धावा केल्या आणि 15 विकेट्सही घेतल्या होत्या. भारत सामना गमावेल, अशी ज्यावेळी शक्यता होती, तेव्हा युवराज मैदानात भक्कमपणे उभा राहिला. कॅन्सरचा आहे माहित असताना देखील युवराज देशासाठी खेळला. त्यामुळे आजही भारतीयांना त्याचा सार्थ अभिमान आहे.

6/11

एस एस धोनी मुळता युवराजची फटकेबाजू सुरू असल्याने धोनीची बॅट जास्त वर्ल्ड कपमध्ये चालली नाही. मात्र, अखेरच्या सामन्यात धोनीने रौद्ररुप दाखवत श्रीलंकेविरुद्ध दमदार खेळी केली. धोनीने 79 चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 91 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. त्याचा अखेरचा षटकार आजही अनेकांच्या नजरेत भरलेला आहे.

7/11

सुरेश रैना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रैनाने 28 चेंडूत नाबाद 34 धावा केल्या आणि युवराज सिंगसोबत 74 धावांची सामना विजयी भागीदारी केली होती. तर फिल्डिंगच्या बाबतीत रैनाचा हात कोणीच धरू शकलं नाही. रैनाने 15 ऑगस्ट 2020 रोजी धोनीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

8/11

हरभजन सिंह भारताच्या फिरकी डिपार्टमेंटची बाजू सांभाळणाऱ्या हरभजन सिंहने  9 सामन्यात फक्त 9 विकेट्स घेतल्या. अंतिम सामन्यात त्याने तिलकरत्ने दिलशानची महत्त्वाची विकेट घेतली आणि भारताला विजयाच्या उंभरट्यावर नेलं. हरभजनने डिसेंबर 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली.

9/11

जहीर खान  टीम इंडियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज जहीर खानने 9 सामन्यांमध्ये 21 विकेट्स घेत विरोधी संघाचं कबरडं मोडलं. फलंदाजीमध्ये युवराजची कामगिरी जेवढी महत्त्वाची होती, तेवढीच गोलंदाजीत जहीर खानची गोलंदाजी फायद्याची ठरली. जहीर खानने 15 ऑक्टोबर 2015 रोजी क्रिकेटला रामराम केला.

10/11

मुनाफ पटेल मुनाफ पटेलने 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये 8 सामन्यात एकूण 11 विकेटस घेतले होते. मुनाफ पटेलने नोव्हेंबर 2018 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. लिजेंड्स लीगमध्ये मुनाफ खेळताना दिसला होता.

11/11

एस श्रीसंत एस श्रीसंत हा वर्ल्ड कपमधील टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू राहिला. महत्त्वाच्या सामन्यात विकेट घेऊन देणाऱ्या श्रीसंतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोलाची कामगिरी केली. वर्ल्ड कपनंतर तो वादाच्या भोवऱ्यात सापडला. स्पॉट फिक्सिंगमध्ये त्याचं नाव आल्याने त्याच्यावर बंदी लावण्यात आली होती. श्रीसंतने मार्च 2022 रोजी त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. आला तो आयपीएलमध्ये समालोचक आहे.