मसाले, मीठ, साखर ओलसर लागतेय? करून पाहा हे सोपे घरगुती उपाय...

Tips to Protect Food Items From Moisture: अगदी सुकी मच्छी साठवण्यापासून, कडधान्य भरेपर्यंत सर्व गोष्टींचा घाट घरातलं महिला मंडळ घातलाना दिसतं. काही कारणानं याचा विसर पडल्यास मात्र चांगलीच अडचण होते! 

Jul 20, 2023, 14:38 PM IST

Tips to Protect Food Items From Moisture : पावसाळी दिवसांच्या आधी घरात कामं सुरु असतात ती म्हणजे या दिवसांमध्ये अन्नपदार्थांची निगा राखण्याची. या वातावरणामध्ये स्वयंपाकामध्ये वापरात येणाऱ्या पदार्थांचं नुकसान होऊ नये यासाठी अनेक उपाय अवलंबले जातात. 

1/7

Kitchen Tips

Tips to Protect Masala grains salt Food Items From Moisture in rainy season

Kitchen Tips : तुम्हीही अशाच अडचणीनं त्रस्त आहात का? म्हणजे मसाले किंवा तत्सम पदार्थांमध्ये येणाऱ्या दमटपणामुळं तुम्हीही चिंतेत आहात का?   

2/7

घरगुती उपाय

Tips to Protect Masala grains salt Food Items From Moisture in rainy season

आता चिंता करायची गरज नाही. कारण, यावरचे काही सोपे उपाय आपण इथं पाहणार आहोत. 

3/7

मसाले

Tips to Protect Masala grains salt Food Items From Moisture in rainy season

लाल तिखट अर्थात वर्षभर चालेल असा मसाला चांगला ठेवण्यासाठी, त्याला दमटपणा धरु न देण्यासासाठी त्यामध्ये अख्ख्या लवंगी मिरच्या आणि लवंग मिसळा. मसाल्यामध्ये तुम्ही हिंगाचा खडाही ठेवू शकता.  

4/7

हळद

Tips to Protect Masala grains salt Food Items From Moisture in rainy season

रोजच्या जेवणाध्ये वापरली जाणारी हळद चांगली रहावी यासाठी ती लहान लहान डब्यांमध्ये ठेवत त्यामध्ये तमालपत्र ठेवावं. अशानं हळदीमध्ये बाष्प धरत नाही.   

5/7

साखर

Tips to Protect Masala grains salt Food Items From Moisture in rainy season

पावसाळी दिवसांमध्ये सहसा साखरही हाताला ओलसर भासते. हे टाळण्यासाठी साखरेच्या डब्यात एका पुरचुंडीमध्ये तांदूळ बांधून ठेवा. अशानं तांदुळाची पुरचुंडी पाष्प खेचून घेते.   

6/7

मीठ

Tips to Protect Masala grains salt Food Items From Moisture in rainy season

मीठामध्ये ओलसरपणा येऊ नये यासाठी नेमकं काय करावं याचा विचार तुम्ही करत असाल तर लक्षात घ्या की मीठाच्या डब्यात कायम एक दालचिनीचा तुकडा ठेवा. 

7/7

धान्य, कडधान्य

Tips to Protect Masala grains salt Food Items From Moisture in rainy season

राहता राहिला प्रश्न कडधान्यांचा तर, या गोष्टींमध्ये बाष्प येऊ नये यासाठी तुम्ही तमालत्र, दालचिनी किंवा लवंग मिसळा. लवंगी मिरचीसुद्धा इथं तुमची मदत करू शकेल.  (सर्व छायाचित्र- फ्रिपीक)