Top 10 female Actresses of India : 'या' अभिनेत्रीने आलिया भट्ट-दीपिका टाकले मागे, नाव पाहून त्यासुद्धा हडबडतील
कासवगतीने येऊन बाजी मारणारी ती कोण?
Most popular female film stars in India : बॉलिवूडमध्ये नेहमीच तीव्र स्पर्धा पाहायला मिळते. पण हल्ली साऊथ चित्रपट आणि बॉलिवूड चित्रपट नेहमीच चर्चेत असतात. साऊथचे सेलिब्रिटी स्वत:चे नशीब चमकवण्यासाठी बॉलिवूडमध्ये आले होते. पण त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तुम्हाला माहितेय का साऊथमधील एका अभिनेत्रीने बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट, दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांचा पराभव केला आहे. IMBD च्या टॉप-10 सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत 9 चित्रपट दक्षिणेतील होते, तर फक्त एक बॉलिवूड चित्रपट 'द काश्मीर फाइल्स'ला स्थान मिळू शकले. आता आणखी एक यादी समोर आली आहे, ज्यामध्ये साऊथमधील एका अभिनेत्रीने बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट, दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफला पराभूत केले आहे.

Ormax ने नोव्हेंबर महिन्यासाठी 'भारतातील सर्वात लोकप्रिय महिला फिल्म स्टार्स' ची 'Most popular female film stars in India' यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने प्रथम क्रमांक मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. या यादीत सामंथा रुथ प्रभू पहिल्या, आलिया भट्ट दुसऱ्या, दीपिका पदुकोण पाचव्या आणि कतरिना कैफ आठव्या क्रमांकावर आहे.



गेल्या काही महिन्यांपासून तिच्या बहुप्रतिक्षित 'टायगर 3' चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात असलेली कतरिना कैफनेही या यादीत 8 व्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे, तर ती पुन्हा या चित्रपटासाठी सुपरस्टार सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तो मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असून याविषयी लोकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेला 'यशोदा' या चित्रपटातून समांथाला बॉलिवूडमध्ये चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. तिच्या दमदार अभिनयामुळे तिचे सर्वत्र कौतूक होत आहे. पण गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. समंथा मायोसिटिस नावाच्या आजाराने त्रस्त आहे, त्यामुळे तिने कामातूनही ब्रेक घेतला आहे.
Most popular female film stars in India actress leaves Alia Bhatt Deepika behind Samantha Ruth Prabhu nz
