सर्वोत्तम विद्यापीठांच्या यादीत 'या' ठरल्या Top 5 Universities; जाणून घ्या

Top 5 Universities: जगातील सर्वोत्तम महाविद्यालय किंवा विद्यापीठात शिक्षण पूर्ण करण्याचं अनेक विद्यार्थ्यांच स्वप्न असतं. त्याचबरोबर, पालकांचीही इच्छा असते की त्यांनी आपल्या पाल्याने परदेशात शिक्षणासाठी पाठवावं.  दरवर्षी जगातील अशा देशांची यादी तयार केली जाते, ज्या ठिकाणी उत्तम दर्जाची शिक्षण व्यवस्था आहे. आज आम्ही तुम्हाला जगातील Top 5 Universities बद्दल माहिती सांगणार आहोत.

Oct 09, 2022, 18:00 PM IST
1/5

Australia

शिक्षणाच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचे नाव प्रथम येतं. ऑस्ट्रेलियातली शिक्षण व्यवस्था अतिशय चांगली मानली जाते.  ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी, युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न या विद्यापीठांचा समावेश सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये आहे.

2/5

Canada

कॅनडा शिक्षणात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतासोबतच इतर अनेक देशांतील विद्यार्थी कॅनडामध्ये उच्च शिक्षणासाठी येतात. या ठिकाणी ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ आणि टोरंटो विद्यापीठ खूप चांगले मानले जाते.

3/5

Germany

जर्मनी तिसऱ्या स्थानावर आहे. म्युनिक युनिव्हर्सिटी, टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक आणि हेडलबर्ग युनिव्हर्सिटी हे जर्मनीतील विद्यापीठे खूप प्रसिद्ध आहेत.

4/5

America

शिक्षण व्यवस्थेत अमेरिकेची वेगळी ओळख आहे. इथे प्रत्येकजण हार्वर्ड विद्यापीठाच्या नावाने ओळखतो. हार्वर्ड व्यतिरिक्त, जगातील सर्वात प्रसिद्ध तांत्रिक विद्यापीठ मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) आहे. शिक्षणात अमेरिका चौथ्या क्रमांकावर आहे.

5/5

Switzerland

जगातील सर्वोत्तम शिक्षण पद्धतीच्या यादीत स्वित्झर्लंड पाचव्या क्रमांकावर आहे. बेन विद्यापीठ, जिनेव्हा विद्यापीठ आणि झुरिच विद्यापीठ हे याठिकाणातील प्रसिद्ध विद्यापीठे आहेत.