Neck Pain : मान दुखल्यास किंवा लचकल्यास करा 'हे' घरगुती उपाय

जर तुमची देखील मान लचकली असेल किंवा दुखत असेल तर तुम्ही हे घरगुती उपाय करू शकता. जाणून घ्या सविस्तर

| Jan 19, 2025, 12:49 PM IST

Neck Pain :  मान दुखल्यास किंवा लचकल्यास करा 'हे' घरगुती उपाय  | top 6 home remedies for neck pain mar

1/7

घरगुती उपाय

जर तुमची देखील मान दुखत असेल किंवा लचकली असेल तर तुम्ही पुढील घरगुती उपाय करू शकता. 

2/7

टेनिस बॉल

मान दुखत असेल तर टेनिस बॉलच्या मदतीने मानेवर हलक्या हाताने मसाज करू शकता. यामुळे रक्तप्रवाह सुरळित होतो. 

3/7

स्ट्रेच करा

तसेच मान दुखत असेल तर हळूहळू तुमची मान छातीपर्यंत खाली घेऊन जा. त्यानंतर काही मिनिटांनी मान सरळ करून मागच्या बाजूला झुकवा. परत काही मिनिटांनी ती सरळ करा. 

4/7

बर्फ

मान लचकली किंवा दुखत असेल तर तुम्ही बर्फाचा वापर करू शकता. एका सुती कापडामध्ये बर्फ घेऊन तो मानेवर ठेवा. 

5/7

शेक

एक सुती कापड घेऊन ते थोडे गरम करून मान दुखत असलेल्या ठिकाणी शेक द्या. यामुळे मानेच्या वेदना कमी होण्यास मदत होते. 

6/7

शॉवर

मान दुखत असेल तर गरम शॉवर घेण्याचा किंवा हीट पॅच लावण्याचा विचार करा. यामुळे थोडा आराम मिळेल. 

7/7

मालिश

मान दुखत असलेल्या ठिकाणी 20-30 सेकंदांसाठी दाबा आणि मग सोडून द्या. त्या ठिकाणी मालिश करा. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)