ट्रेनच्या तिकिटात 'या' रुग्णांना मिळते सवलत, आजारांची यादी पाहा

Train fare Discount:क्षयरोगाचे रुग्ण आणि त्यांच्यासोबत आलेले परिचर यांना द्वितीय, स्लीपर आणि फर्स्ट क्लासमध्ये 75 टक्के सवलत मिळते. अटेंडंटलाही तितकीच सवलत दिली जाते. 

Pravin Dabholkar | Aug 19, 2023, 14:24 PM IST

Train fare Discount: कॅन्सरचे रुग्ण आणि त्यांच्यासोबत आलेल्या एका अटेंडंटला रेल्वेच्या तिकिटात सवलत मिळते. या रुग्णांना फर्स्ट एसी कार, फर्स्ट क्लास, सेकंड क्लासमध्ये 75% सूट मिळते. याशिवाय स्लीपर आणि एसी-3 टियरमध्ये 100 टक्के सूट आहे. फर्स्ट एसी आणि एसी-2 टियरमध्ये 50% सूट असते. तर अटेंडंटना स्लीपर आणि AC-3 सीटवर 75 टक्के सूट मिळते.

1/8

ट्रेनच्या तिकिटात 'या' रुग्णांना मिळते सवलत, आजारांची यादी पाहा

Train fare Discount for Patients see the list of diseases

Train fare Discount: रेल्वेने दररोज प्रवास करणाऱ्या रुग्ण प्रवाशासााठी एक महत्वाची अपडेट आहे. शिक्षण घेणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासोबत रुग्णांनाही रेल्वेच्या तिकीटात सवलत दिली जाते. कोणते आजार असलेल्या रुग्णांना रेल्वे तिकिटात सवलत मिळते? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

2/8

कॅन्सरचे रुग्ण

Train fare Discount for Patients see the list of diseases

कॅन्सरचे रुग्ण आणि त्यांच्यासोबत आलेल्या एका अटेंडंटला रेल्वेच्या तिकिटात सवलत मिळते. या रुग्णांना फर्स्ट एसी कार, फर्स्ट क्लास, सेकंड क्लासमध्ये 75% सूट मिळते. याशिवाय स्लीपर आणि एसी-3 टियरमध्ये 100 टक्के सूट आहे. फर्स्ट एसी आणि एसी-2 टियरमध्ये 50% सूट असते. तर अटेंडंटना स्लीपर आणि AC-3 सीटवर 75 टक्के सूट मिळते.  

3/8

थॅलेसेमियाचे रुग्ण

Train fare Discount for Patients see the list of diseases

थॅलेसेमियाचे रुग्ण आणि त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्यांना रेल्वे तिकिटात सवलत मिळते. याशिवाय हृदय शस्त्रक्रियेसाठी जाणारे रुग्ण आणि अटेंडंट, ऑपरेशन किंवा डायलिसिससाठी जाणारे मूत्रपिंड रुग्ण यांनाही सूट मिळते. या रुग्णांना सेकंड, स्लीपर, फर्स्ट क्लास, एसी-3 टायर, एसी चेअर कार, फर्स्ट आणि एसी-2 टायरमध्ये 50 टक्के सवलत मिळते. परिचरांनाही या सुविधा मिळतात.

4/8

क्षयरोगाचे रुग्ण

Train fare Discount for Patients see the list of diseases

क्षयरोगाचे रुग्ण आणि त्यांच्यासोबत आलेले परिचर यांना द्वितीय, स्लीपर आणि फर्स्ट क्लासमध्ये 75 टक्के सवलत मिळते. अटेंडंटलाही तितकीच सवलत दिली जाते. 

5/8

एड्स रुग्णांना सवलत

Train fare Discount for Patients see the list of diseases

उपचारासाठी किंवा तपासणीसाठी जाणाऱ्या एड्स रुग्णांना सेकंड क्लासमध्ये 50% सवलत दिली जाते.

6/8

अ‍ॅनिमियाच्या रुग्ण

Train fare Discount for Patients see the list of diseases

अ‍ॅनिमियाच्या रुग्णांना स्लीपर, एसी चेअर कार, एसी-3 टायर आणि एसी-२ टायरमध्ये 50% सवलत मिळते.

7/8

हिमोफिलियाचे रुग्ण

Train fare Discount for Patients see the list of diseases

उपचारासाठी किंवा तपासणीसाठी जाणारे हिमोफिलियाचे रुग्ण आणि त्यांच्यासोबत आलेले परिचर यांना रेल्वे तिकिटात सवलत मिळते. या लोकांना सेकंड, स्लीपर, फर्स्ट क्लास, एसी-3 टायर, एसी चेअर कारमध्ये 75 टक्के सवलत मिळते.

8/8

कुष्ठरुग्णांना भाड्यातही सूट

Train fare Discount for Patients see the list of diseases

कुष्ठरुग्णांना भाड्यातही सूट मिळते. अशा रुग्णांना द्वितीय, स्लीपर आणि प्रथम श्रेणीमध्ये 75 टक्के सवलत दिली जाते.