PHOTOS: ट्रेकिंग करताना 'या' गोष्टींची ठेवा काळजी!

Trekking Safety Tips in Marathi: आजकाल अनेक लोक हे ट्रेकिंग करायला जातात. आपले मित्र ट्रेक करायला जात आहेत हे पाहून इतरही त्यांच्यासोबत जातात. पण तुम्हाला माहितीये का? ट्रेक करण्यासाठी देखील एक स्किल लागते. त्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे ते जाणून घेऊया. 

| Feb 19, 2024, 18:07 PM IST
1/7

आठवणीतील ट्रिप

कोणतीही ट्रिप असो ती आपल्यासाठी एक आठवणी देऊन जाते. कारण त्यावेळी आपण वेगवेगळ्या आणि नवीन गोष्टी करत असतो. 

2/7

बॅगेत जास्त सामान नसावा

ट्रेक करताना एक गोष्ट ही लक्षात ठेवायची असते आणि ती म्हणजे बॅगमध्ये जास्त सामान ठेवू नये. 

3/7

पाण्याची बाटली

पाण्याची बाटली जर तुम्ही विसरलात तर तुम्हाला अडचण होण्याची शक्यता असते. त्यामुळे काहीही झालं तरी पाण्याची बाटली कधी विसरू नका. 

4/7

नाश्ता करणं विसरू नका

कोणत्याही परिस्थितीत नाश्ता करणं विसरू नका कारण तुमच्या शरीरात ताकद हवी. तरच तुम्ही ट्रेक करू शकाल. 

5/7

एकटं जाऊ नका

कधीही ट्रेक करताना एकटं जाऊ नका. कोणाला तरी सोबत घेऊन जा. कारण त्यानं तुम्हाला ट्रेक करताना कंटाळ येणार नाही. 

6/7

मद्यपान

ट्रेक करण्याआधी किंवा करत असताना चुकूनही मद्यपान करू नका. नाही तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. 

7/7

हेल्दी जेवण ठेवा

जेव्हा तुम्ही ट्रेकवर जाता तेव्हा तुमच्यासोबत हेल्दी खाणं ठेवा. (Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)