बाईSSSS... एवढी महाग बाईक; एका बाईकच्या किंमतीत 10 बाईक येतील

Triumph Daytona 660  फिचर्स काय आहेत.  बाईकची किंमत किती आहे? जाणून घेऊया सर्व काही.

| Aug 29, 2024, 21:06 PM IST

Triumph Daytona 660 :  Triumph कंपनीने आपली नवी स्पोर्ट्स बाईक भारतात लाँच केली आहे. Triumph Daytona 660 असे या बाईकचे नाव आहे.  स्टाईलीश लूक आणि पावरफुल इंजिन हे या बाईकचे बेस्ट फिचर आहेत. ही बाईक भारतातील महागड्या बाईक्सना टक्कर देत आहे. 

1/7

Triumph या ब्रिटीश ऑटोमोबाईल कंपनीने आपली Triumph Daytona 660  ही स्पोर्ट्स बाईक भारतात लाँच केली आहे. 

2/7

या बाईकची स्टार्टिंग प्राईज 9.72 लाख रुपये इतकी आहे. 

3/7

या बाईकमध्ये समोरच्या बाजूला ट्विन 310 मिमी डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये 220 मिमी डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.

4/7

या बाईकमध्ये एलईडी लाईटसह, ड्युअल-चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि तीन राइडिंग मोड देण्यात आले आहेत. 

5/7

बाईकचे इंडिन 11,250 rpm वर 95bhp पॉवर आणि 8,250 rpm वर 69Nm टॉर्क जनरेट करते.  

6/7

या बाइकमध्ये 660 सीसी क्षमतेचे इनलाइन थ्री-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. 

7/7

ही बाईक स्पोर्ट्स बाईक असली तरी हीचा लुक मात्र खूपच स्टाईलीश आहे. या बाइकमध्ये स्प्लिट हेडलाइटसह पारदर्शक विंडस्क्रीन देण्यात आली आहे.