'हा' देश आहे फक्त 12 किलोमीटर लांब, लोक राहतात 200 मीटर रुंदीमध्ये; आहे फक्त एक हॉस्पिटल आणि पोलिस स्टेशन

तुम्हाला अशा देशाबद्दल माहिती आहे का ज्याची लांबी फक्त 12 किलोमीटर आणि रुंदी 200 मीटर आहे. चला जाणून घेऊयात

| Oct 26, 2024, 19:53 PM IST

smallest country: तुम्हाला अशा देशाबद्दल माहिती आहे का ज्याची लांबी फक्त 12 किलोमीटर आणि रुंदी 200 मीटर आहे. चला जाणून घेऊयात

1/10

जगभरातील विचित्र देश

Country of Tuvalu: जगभरात असे अनेक विचित्र देश आहेत, जे त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्र, संस्कृती आणि लोकांच्या जीवनशैलीमुळे प्रसिद्ध आहेत.

2/10

फक्त 12 किलोमीटर लांब देश

पण तुम्हाला अशा देशाबद्दल माहिती आहे का ज्याची लांबी फक्त 12 किलोमीटर आणि रुंदी 200 मीटर आहे.  

3/10

किती आहे लोकसंख्या?

हा सुंदर देश सर्व बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. या देशात सुमारे 11000 लोक राहतात. येथे फक्त एकच हॉस्पिटल आणि एक पोलिस ठाणे आहे.

4/10

बेटांनी बनलेला आहे देश

हा सगळ्यात छोटा देश 9 बेटांनी बनलेला देश आहे. या देशाचे नाव आहे तुवालू. 

5/10

जगातील चौथा सर्वात लहान देश

तुवालु हा जगातील चौथा सर्वात छोटा देश मानला जातो, इथे इतके कमी लोक आहेत की प्रत्येकजण एकमेकांच्या आनंदात-दुःखात सहभागी होतो.

6/10

बुडत आहे तुवालु देश

पण वाईट गोष्ट म्हणजे हवामान बदलामुळे तुवालू देश सतत बुडत आहे. एका संशोधनानुसार येत्या ४०५० वर्षांत हा देश समुद्रात पूर्णपणे बुडून जाईल. 

7/10

कशामुळे तुवालू चर्चेत आला?

2021 मध्ये, तुवालूचे परराष्ट्र मंत्री सायमन कोफे यांनी गुडघाभर पाण्यात उभे असताना संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत भाषण दिले. जेणेकरून ते जगाचे लक्ष स्वतःकडे आकर्षित करू शकतील.  

8/10

देश आहे प्रशांत महासागराने वेढलेला

पॅसिफिक महासागरात वसलेला हा देश पूर्वी एलिस बेट म्हणून ओळखला जात असे. या देशात एकच विमानतळ आहे. हे विमानतळ अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात बांधला होता.

9/10

किती पर्यटक येतात?

या देशात येतात खूप कमी पर्यटक येतात. कारण तिथे संसाधनांची कमतरता आहे. तथापि, या देशाची स्वतःची भाषा, चलन आणि ध्वज देखील आहे.  

10/10

ऑस्ट्रेलियाने दिली शरण होण्याची ऑफर

मात्र, ऑस्ट्रेलियन सरकारने या देशांतील नागरिकांना आश्रय देऊ केला आहे. UNDP शास्त्रज्ञांनी सांगितले की, आम्ही या बेटावर हवामान बदलामुळे होणाऱ्या बदलांचा अभ्यास करत आहोत.