लसणाची फक्त एक पाकळी वाढवेल तुमच्या त्वचेचं सौंदर्य, भासणार नाही महागड्या क्रीमची गरज

कोणताही पदार्थ बनवताना त्यात लसूण घातल्यानंतर एक वेगळीच चव येते किंवा जेवण आणखी रुचकर होतं असं म्हणतात. लसूण खाल्ल्याने फक्त आजारच ठीक होत नाही तर ते त्वचेलाही तितकेच फायदेशीर आहे. मुरमांवर देखील लसूण हा फायदेकारक आहे. पण हाच लसून जर तुम्ही चेहऱ्याला लावला तर त्यानं काय फायदा होईल याविषयी तुम्ही कधी ऐकलतं का? तर आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. 

| Oct 26, 2024, 18:54 PM IST
1/7

लसणाची चव अनेकांना आवडत नसली तरी त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. जर एखादी व्यक्ती ही कच्चा लसूण खात असेल तर त्याचे अनेक आरोग्यदायी संकटांपासून संरक्षण होते. 

2/7

लसूण खाल्ल्यानं त्वचा निरोगी राहते आणि त्यावर एक चमक येते. लसूणमध्ये बरेच जैविक गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरचे डाग देखील नाहीसे होतात.

3/7

लसूणमजध्ये अँटिऑक्सिडेंट्स असल्यानं चेहऱ्यावरील मुरूम कमी होण्यास देखील मदत होते. 

4/7

याशिवाय लसूण खाल्यानं त्वचेवरची सूज कमी होते. रोज एक पाकळी खाल्ल्यानं त्वचा हेल्दी होते. 

5/7

त्वचारोग तज्ज्ञांचं म्हणणं आहे की लसूण खाल्ल्यानं चेहऱ्यावर तेज येतो आणि डागांपासून सुटका मिळते. त्याशिवाय रक्त शुद्ध होण्यास देखील मदत होते. 

6/7

ज्या लोकांना चेहऱ्यावर खाज, मुरूम, त्वचेचा कोरडेपणा येण्यासारख्या समस्या उद्भवत आहेत. त्यांनी सकाळी उपाशीपोटी लसूण खाऊ नये कारण लसूण खूप गरम असतो, त्यामुळे त्वचेला आणखी त्रास होऊ शकतो.

7/7

ज्यांना त्वजेसंबंधीत काही समस्या असतील तर त्यांनी लसूण खायला हवा. त्यानं नक्कीच फायदे होतील. असं असलं तरी देखील कोणत्याही गोष्टीचं मर्यादेपेक्षा जास्त सेवन करु नये त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)