Budget 2024 सादर होताच सोशल मीडियावर Memes व्हायरल, कॉमन मॅन आणि नोकरदारवर्गावर फनी मिम्स
Budget 2024 Social Media Memes: मंगळवारी 23 जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपल्या कार्यकाळातील सातवा बजेट सादर केला जात आहे. यावेळी सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आज 2024 चा अर्थसंकल्प सादर करत आहे. इतर बजेटप्रमाणेच या बजेटकडून सामन्यांना खूप अपेक्षा आहेत. या अर्थसंकल्पातून नोकदारवर्गाला काय मिळणार? सामान्य लोकांना पाने पुसली जाणार का? असा देखील सवाल विचारला जात आहे. टॅक्स स्लॅबमध्ये काही बदलाव होणार का? याकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. कॉमन मॅनला या अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा आहेत.
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात हा बजेट सादर होणार आहे. 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर करायला सुरुवात केली. त्याचवेळी सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडू लागला. आपण हे मिम्स पाहणार आहोत.






