Rang Panchami 2024 : रंगपंचमीच्या दिवशी जन्मलेल्या मुलांसाठी खास नावे, अर्थ देखील बहुरंगी
Baby Names on Rang Panchami : होळीच्या पाच दिवसांनी रंगपंचमी साजरी केली जाते. रंगपंचमी म्हणजे रंगांची उधळण. या दिवशी तुमच्या घरी बाळ जन्माला आलं असेल तर खालील नावांचा नक्की विचार करा.
होळी झाल्यानंतर वेध लागतात ते रंगपंचमीचे. होळीच्या पाच दिवसांनी हा सण साजरा केला जातो. रंगपंचमीला रंग किंवा गुलाल उधळण्याची परंपरा आहे. या दिवशी देवतांसह होळी खेळण्याची परंपरा आहे. कोकणात या दिवसापासून शिमगोत्सवाला सुरुवात होतो. अशा पवित्र दिनी जर तुमच्या घरी गोंडस बाळाचा जन्म झाला असेल तर त्याच्यासाठी खास नावे निवडा. ज्या नावांमध्ये रंग आणि परंपरेचा इतिहास दडलेला आहे.
होळी ते रंगपंचमीच्या दिवसांमध्ये घरी बाळाचा जन्म झाला तर आता त्याच्यासाठी गोड नाव शोधण्याची लगबग सुरु असेल. अशावेळी पालक खालील नावांचा विचार करु शकता. मुलांना नाव देणे हा एक संस्कार आहे. हा संस्कार किती महत्त्वाचा आहे, याची जाणीव प्रत्येक पालकांना माहित आहे. त्यामुळे खालील नावांचा विचार करा.
(Photo Credit - Freepik.com)