गोणी, दुधाची किटली मिळेल त्यात कोंबड्या भरल्या, ट्रक अपघातानंतर हायवेवर कोंबडीचोर... Photo

Etawah News: कोंबड्या घेऊन जाणाऱ्या ट्रक राष्ट्रीय महामार्गावर पलटल्याने मोठा अपघात झाला. अपघात होताच रस्त्यावर एकच गर्दी झाली. पण लोकांनी अपघातग्रस्त चालकाला मदत करण्याऐवजी चक्क ट्रकमधल्या कोंबड्यांची लूट सुरु केली.

राजीव कासले | Feb 28, 2024, 19:49 PM IST
1/7

राष्ट्रीय महामार्गावर कोंबड्या घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यावर पलटी झाला आणि ट्रकमधील कोंबड्या रस्त्यावर विखुरल्या. अपघातानंतर घटनास्थळी लोकांची एकच गर्दी झाली. 

2/7

उत्तर प्रदेशमधल्या इटावा महामार्गावरील ही घटना आहे. राष्ट्रीय महामार्ग-2 वर हा अपघात झाला. टायर फुटल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक पलटी झाला. पण धक्कादायक म्हणजे घटनास्थळी जमलेल्या लोकांनी ट्रक चालकाला वाचवण्याऐवजी गाडीतील कोंबड्या लुटायला सुरुवात केली.

3/7

राष्ट्रीय महामार्गावर जवळपास एक तास लुटीचा हा प्रकार सुरु होता. रस्त्यावरुन जाणाऱ्या कार असो की मोटारसायकल असो. गाड्या थांबवून लोकं कोंबड्या लूटुन नेत होते. 

4/7

अपघाताची मा्हिती कळताच आसपासच्या गावातील लोकंही अपघाताच्या ठिकाणी पोहोचली. कोणी गोण्यांमध्ये, तर कोणी चक्क दुधाच्या किटलीत कोंबड्या भरून नेत होते. ट्रक चालकाने लोकांना थांबवण्याचा बराच प्रयत्न केला. पण गर्दीपुढे तोही हतबल होता.

5/7

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा ट्रक कानपुरहून आगराच्या दिशेने जात होता. मोहम्मद शरीप खान असं ट्रक चालकाचं नाव आहे. ट्रक पलटल्याने आतील कोंबड्या रस्त्यावर विुखरल्या गेल्या.

6/7

धक्कादायक म्हणजे यात कोंबड्या चोरून नेण्यात महिलाही मागे नव्हत्या. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार एकेका व्यक्तीने दहा ते 15 कोंबड्या चोरून नेल्या. यात ट्रक चालकाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं.

7/7

या घटनेने राष्ट्रीय महामार्गावर लोकांची एकच गर्दी झाली होती. यामुळे वाहतूकही ठप्प झाली. घटनेच्या तब्बल एक तासानंतर पोलीस आले आणि त्यांनी गर्दी पांगवली.