Vastu Tips : घरी आणा मातीपासून बनवलेल्या 'या' 6 वस्तू, लक्ष्मी होईल प्रसन्न; हाती पैसाच पैसा

Vastu Money Tips: माता लक्ष्मी प्रसन्र झाली की तुमच्या हातात पैसाच पैसा येईल. मात्र, त्यासाठी काही गोष्टी कराव्या लागती. हिंदू धर्मात लक्ष्मीला विशेष स्थान आहे.  शुक्र ग्रह सौंदर्य, संपत्ती आणि व्यापाराचा कारक मानला जातो. घरात मातीपासून बनवलेल्या काही वस्तू ठेवल्याने सुख-संपत्ती मिळते असे मानले जाते. यासोबतच शुक्राच्या शक्तीमुळे चंद्र आणि शनीचे दोषही कमी होतात. 

Jun 11, 2023, 11:42 AM IST
1/6

घरामध्ये मातीच्या मूर्तीची स्थापना केल्याने घरात सकारात्मकता राहते. घरामध्ये मातीची गणेश किंवा लक्ष्मीची मूर्ती ठेवा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल. आणि तुमच्या हाती पैसा राहिल.

2/6

 मातीच्या वस्तू वास्तू : शास्त्रात पूजेच्या वेळी मातीचे भांडे वापरणे शुभ मानले जाते. मातीच्या भांड्यात 1 रुपयाचे नाणे टाकून पूजागृहात ठेवा, असे सांगितले जाते. यामुळे शुभ घटना घडण्यास मदत होते.

3/6

शास्त्रात असे सांगितले आहे की, पाणी थंड करण्यासाठी मातीचे भांडे वापरावे. ते पाण्याने भरुन उत्तर दिशेला ठेवावे. पाण्याचा संबंध माता लक्ष्मीशी आहे असे मानले जाते. असे केल्याने त्याची कृपा तुमच्यावर राहते.

4/6

घरी एक काम केले पाहिजे. संध्याकाळी तुळशी वृंदाजवळ दिवा लावणे शुभ मानले जाते. मातीचा दिवा हे पंचतत्वाचे प्रतीक मानले जाते. असे केल्याने वैवाहिक जीवनात गोडवा येतो. 

5/6

तुम्ही एक गोष्ट आवर्जुन केली पाहिजे. ड्रॉईंग रुममध्ये मातीची खेळणी किंवा मातीच्या वस्तू ठेवल्याने पैशाचा ओघ वाढतो. तसेच, ते सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्रदान करतात.

6/6

ही काळजी घ्या. काजळी घेतली नाही तर लक्ष्मी नाराज होईल. घरातील झाडे आणि रोपे नेहमी मातीच्या किंवा सिरॅमिक कुंड्यांमध्ये लावावीत. रोपे लावण्यासाठी प्लास्टिकची भांडी वापरु नका, यामुळे नकारात्मकता वाढू शकते.   (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)