Vastu Tips :घरात या दिशेला चुकूनही ठेऊ नका चपला...घरावर येईल प्रचंड संकट...जाणून घ्या योग्य दिशा

 (vastu shastra tips for keeping shoes)चप्पल- बूट आणि ते ठेवण्याची पद्धतही आर्थिक परिस्थितीवर (financial condition) प्रभाव पाडते. त्यामुळं चपला नेमक्या घराच्या कोणत्या दिशेला ठेवाव्यात ते एकदा पाहाच. 

Jan 04, 2023, 09:15 AM IST

आपल्या आयुष्यात सर्वकाही सुरळीत (tips for happy healthy life ) चालू राहावं अशी प्रत्येकाची इच्छा असते, यासाठी आपण जमेल त्या परीने प्रयत्न करत असतो पण बऱ्याचदा अजाणतेपणी आपण अश्या काही गोष्टी करून बसतो की,  त्याचा फटका आपल्याला बसतो. अश्या काही गोष्टींमध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे वास्तू शास्त्र. वास्तू शास्त्रात (vastu shastra tips) काही नियम घालून दिले आहेत ते जर आपण पळाले नाहीत तर त्याचा थेट फटका आपल्याला बसतो. 

1/5

वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार (vastu tips) घराच्या उत्तर - पूर्व दिशेला चप्पल किंवा बूट ठेवणं, फार अशुभ ठरतं. ही दिशा सकारात्मकतेची आहे, त्यामुळं तिथं पादत्राणे ठेवू नका. घरातील लक्ष्मी निघून जाईल. (Vastu Shastra tips for keeping Shoe Rack)

2/5

बेडरुममध्येही चप्पल किंवा बूट ठेवू नका. असं केल्यास नकारात्मक उर्जा (negative energy) फोफावते. उशीपाशीही चप्पल काढून झोपू नका, हे अतिशय अशुभ आहे. 

3/5

ज्यांना जीवनात प्रगतीपथावर पुढे जायचं आहे, त्यांनी निळ्या रंगांच्या चपलांना प्राधान्य द्या. (blue color shoe for success) असं केल्यास प्रत्येक कामात यश मिळतं.

4/5

मळकट किंवा फाटलेल्या चपला किंवा बूट कधीच वापरु नका. असं केल्यास समाजात तुमची प्रतिमा मलीन होते. आर्थिक फटका आणि दारिद्र्याचं हे लक्षण आहे. 

5/5

वास्तुशास्त्रानुसार कधीच पिवळ्या रंगांच्या चपला वापरू नका. पिवळा रंग गुरु ग्रहाशी संबंधित आहे, त्यामुळं त्या रंगाची चप्पल किंवा बूट घातल्यास तुमचं भाग्य दुर्भाग्यामध्ये बदलण्यास वेळ लागणार नाही.