पावसाळा आला, आत्ताच जेवणाच्या ताटातून 'या' पदार्थांना करा BYE BYE, अन्यथा...

पावसाळ्यात आजारी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. अशावेळी या गोष्टी लक्षात ठेवा 

| Jul 01, 2023, 13:56 PM IST

Do Not Eat These Things In Monsoon: पावसाळ्यात आजारी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. अशावेळी या गोष्टी लक्षात ठेवा 

1/5

पावसाळा आला, आत्ताच जेवणाच्या ताटातून 'या' पदार्थांना करा BYE BYE, अन्यथा...

Vegetables to avoid in monsoon in marathi

पावसाळा सुरू झाला आहे. अशावेळी आरोग्याच्या तक्रारीदेखील वाढतात. पावसाळ्यात शक्यतो बाहेरचे खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, या दिवसांत घरातही जेवण करताना काही भाज्या व पदार्थ खाणे टाळावे, अन्यथा तुमच्या आरोग्याचे गणित बिघडू शकते. 

2/5

पालेभाज्या

Vegetables to avoid in monsoon in marathi

पावसाळ्या सुरू झाल्यानंतर काही हिरव्या पालेभाज्या खाणं टाळलं पाहिजे. पालक, मेथी, शेपू अशा भाज्या खाणं टाळावेत. कारण हिरव्या पालेभाज्यांमध्ये हिरव्या अळ्या असण्याची शक्यता असते. त्यामुळं बॅक्टिरिया पसरण्याची शक्यता जास्त असते. 

3/5

मासे

Vegetables to avoid in monsoon in marathi

पावसाळ्यात मासे खाणे टाळावेत. कारण पावसाळा हा माशांच्या प्रजननांचा काळ असतो. तसंच, मासेमारीदेखील बंद असते. अशावेळी बाजारात ताजे मासे मिळत नाहीत. प्रक्रिया केलेले मासे असतात. अशावेळी जर प्रक्रिया केलेला मासे तुम्ही खाल्लेत तर त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो

4/5

मशरुम

Vegetables to avoid in monsoon in marathi

पावसाळ्यात मशरुम खाणं देखील टाळावे. कारण पावसाळ्यात मशरुम खाल्ल्यास उलटी आणि पोटदुखीसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

5/5

तळलेले पदार्थ

 Vegetables to avoid in monsoon in marathi

पावसाळ्यात तळलेले पदार्थ खाण्याचा मोह सर्वांनाच होतो. मात्र, शरिरासाठी या गोष्टी हानिकारक ठरु शकतात. कारण तळेलेल पदार्थ खाल्ल्याने पोटदुखीसंबंधित विकार होऊ शकतात. तसंच, जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने उलटी व मळमळ होण्याचीही शक्यता असते. तसंच, पावसाळ्यात रोगप्रतिकार शक्ती मंदावते अशावेळी घसा खराब होण्याचाही धोका असतो.