30 कोटी बजेट अन् कमाई 30,00,00,00,000 कोटी, 'या' अभिनेत्याने 10 वर्षात दिले 11 चित्रपट

बॉलिवूडमधील या अभिनेत्याने 10 वर्षात फक्त 11 चित्रपट दिले आहेत. लवकरच हा अभिनेता आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट देणार आहे. 

Soneshwar Patil | Feb 15, 2025, 13:03 PM IST
1/7

बॉलिवूडमधील या अभिनेत्याने विनोदी आणि गंभीर भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. 10 वर्षांच्या कारकि‍र्दीत अभिनेत्याने फक्त 11 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

2/7

आम्ही बॉलिवूड अभिनेता विकी कौशलबद्दल बोलत आहोत. विकीला पहिला हिट चित्रपट आलिया भट्टने जरी दिला असला तरी त्याच्या दुसऱ्या चित्रपटाने असा विक्रम केला जो आतापर्यंत कोणीही मोडू शकले नाही. 

3/7

सध्या विकी कौशल त्याच्या 'छावा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी 2025 मधील सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. 

4/7

विकी कौशलने 'मसान' चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. या चित्रपटातून अभिनेत्याने लोकांच्या हृदयात आपले वेगळे स्थान निर्माण केले. यानंतर त्याचा 'रमन राघव 2' हा चित्रपट प्रदर्शित झाला.परंतु, हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

5/7

विकी कौशलला आलिया भट्टने हिट चित्रपट दिला. ज्याचे नाव 'राजी' होते. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होती. त्यासोबतच या चित्रपटात विकीचा देखील महत्त्वाचा वाटा होता. 

6/7

त्यानंतर मुख्य अभिनेता म्हणून विकीचा 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' हा चित्रपट आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाने मोठ्या प्रमाणात कमाई केली. 

7/7

रिपोर्टनुसार, 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' हा चित्रपट 30 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने 10 पट अधिक कमाई केली. या चित्रपटाने 300 कोटींहून अधिक कमाई केली होती.