PHOTO : मुकेश अंबानी, अदानींपेक्षा श्रीमंत, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित; 120000000000 चे मालक आज राहतोय भाड्याचा घरात

भारतातील श्रीमंत उद्योगपती कोण असं म्हटलं तर आपल्या ओठांवर आपसुक मुकेश अंबानी यांचं नाव येतं. पण फोटोमध्ये दिसणारा हा उद्योगपती एकेकाळी मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या सगळ्यांपेक्षाही श्रीमंत होता. पण त्याचा एका चुकीमुळे 12000 कोटींची मालमत्ता त्याचा हातातून गेली अन् आज त्याला भाड्याचा घरात राहवं लागतंय.     

| Jan 11, 2025, 19:15 PM IST
1/8

वेळ कोणाला कधी काय दाखवलं याचा काही नेम नसतो. आज आपण अशा उद्योगपतीबद्दल जाणून घेणार आहोत, जो एकेकाळी देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती होता. मुकेश अंबानी, गौतम अदानी यांच्यापेक्षा जास्त संपत्ती त्यांच्याकडे होती. हा व्यक्ती होता विजयपत सिंघानिया...  रेमंड ग्रुपचे एकेकाळचे मालक. त्यांनी मुलगा गौतम सिंघानिया यांच्या नावावर सगळी मालमत्ता केली. त्यानंतर कौटुंबिक कलहमध्ये मुलाने त्यांना घराबाहेरचा रस्ता दाखवला.   

2/8

रेमंड ग्रुपचे अध्यक्ष आणि एमडी गौतम सिंघानिया हे प्रसिद्ध आहेत. गेल्या वर्षी पत्नीसोबतचा वाद आणि घटस्फोटामुळे ते चर्चेत आले होते. पण रेमंड या कंपनीला शिखरावर पोहोचवण्यामध्ये विजयपत सिंघानिया यांचं मोठं योगदान आहे.   

3/8

जेव्हा विजयपत सिंघानिया त्यांच्या कारकिर्दीच्या उंच शिखरावर होते. तेव्हा विजयपत हे गौतम अदानी, मुकेश अंबानी, रतन टाटा आणि अनिल अंबानी यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत होते. त्यांचे काका जीके सिंघानिया यांच्या निधनानंतर त्यांनी रेमंडचा व्यवसाय हाती घेतला. त्यानंतर त्यांनी या कंपनीला फॅशन उद्योगातील जागतिक ब्रँड बनवला.

4/8

खरं तर विजयपत यांचा प्रवास कधीच सुखकर नव्हता काकाच्या मृत्यूनंतर रेमंडवर ताबा मिळवण्यासाठी त्यांचा तुलत भावांनी त्यांना खूप त्रास दिला. पण नशिबाचा खेळ विजयपत सिंघानिया हे रेमंडचे पहिले अध्यक्ष झाले. 

5/8

त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने लक्षणीय प्रगती करुन या क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी म्हणून नावारुपाली आली. विजयपत सिंघानिया हे खूप यशस्वी उद्योगपती होते आणि त्यांच्याकडे भरपूर पैसा होता. मात्र कुटुंबातील कलहामुळे त्यांच्या आयुष्यात अशांतता आली. त्यांनी आपल्या दोन मुलांमध्ये व्यवसाय विभागण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात मोठा वादळ आलं. 

6/8

कौटुंबिय वादातून गौतमने वडील विजयपत यांना घरातून काढून टाकलं. यानंतर गौतम सिंघानिया यांनी रेमंड कंपनीची जबाबदारी स्वीकारली. हळूहळू विजयपत आणि गौतमचे संबंध बिघडू लागले. अचानक विजयपत यांनी कंपनीतील आपले सर्व शेअर गौतमला दिले. या निर्णयानंतर पिता-पुत्रांमध्ये मोठा वाद झाला. 

7/8

नंतर गौतमने वडील विजयपत यांना घराबाहेर हाकलून दिले. यानंतर विजयपत सिंघानिया यांना आर्थिक आणि वैयक्तिक समस्यांना सामोरे जावे लागले. एका मुलाखतीत विजयपत यांनी सांगितलं होतं की, 'त्यांना आयुष्य चालवण्यात खूप अडचणी येत आहेत. पूर्वी ते खूप श्रीमंत होते आणि खूप आरामात जगत होते, पण आता तसे नाही.'

8/8

विजयपत सिंघानिया यांनी केवळ व्यवसायातच यश मिळवले नाही, तर त्यांना विमान उडवण्याचीही खूप आवड होती. जेआरडी टाटा यांच्या प्रेरणेने ते विमान उडवायला शिकले आणि त्यांना या क्षेत्रात खूप रस होता. 2012 पर्यंत आयआयएम अहमदाबादच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष नारायण मूर्ती यांचx उत्तराधिकारी म्हणूनही ते मानले जात होते. सिंघानिया यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक सन्मानही मिळाले आहेत. त्यांना पद्मभूषण हा देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.