मृत्यूनंतरही नातेवाईकांसोबतच 'जगतात' इथले गावकरी, या गावात निधन म्हणजे उत्सव!
जर तुम्हाला एका मृतदेहाबरोबर राहायला सांगितले तर ? आपल्याला ऐकायला फार भयानक वाटतं असलं तरी, इंडोनेशियातील या समाजासाठी असे राहणे त्यांच्या परंपरेचा भाग आहे.
हा समाज असे मानतो की ,मृत्यू ही एक दिर्घकाळापर्यत चालणारी प्रक्रिया आहे.जीवन-मृत्यू हे परस्परसंबंधी असतात.मृत्यूनंतर पूरलेले मृतदेह उकरुन काढून घरी नेतो हा समाज.
1/7

2/7
मृतासाठी अन्न् , द्रव्ये आणि सिगारेट

3/7
मृतदेह स्वच्छ करण्याचा सोहळा

ही प्रथा इंडोनेशियातील 'साऊथ सुलावेसी' या ठिकाणच्या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या 'तोराजा' समाजाची आहे. या अजब प्रथेचे नाव 'मानेने'(Ma'nene) असे आहे. 'मानेने' म्हणजे मृतदेह स्वच्छ करण्याचा सोहळा.या विधीदरम्यान तोराजा लोकं त्यांच्या वारलेल्या नातेवाईकांचे मृतदेह चक्क उकरुन काढतात. पूरुन कितीही दिवस झाले असोत ,अनेक वर्षे गेली तरी ते मृतदेह बाहेर काढतात आणि त्यांना बाहेर काढल्यावर जीविताप्रमाणे वागणूक देतात.
4/7
समाजाची मान्यता

तोराजा समाज, माणूस एकदा गेला की गेला या विचाराला मूळीच दूजोरा देत नाही. त्यांची मान्यता अशी आहे की, मानवाचे निर्गमन होत नाही, मृत्यू ही एक दिर्घकाळापर्यत चालणारी प्रक्रिया आहे. तोराजा लोग मृतदेहाला 'तो-माकूला' असे म्हणतात. त्यांना जीविताप्रमाणे अधिकार असतात ,असे हा समाज मानतो. जीवन-मृत्यू हे परस्परसंबंधी असतात, अशी या समाजाची मान्यता आहे.
5/7
मृताची सेवा करण्याचे कारण

मृतास नियमितपणे अंघोळ घातली जाते , त्याचे कपडे बदलले जातात. एवढच नाही तर, मृताच्याखोलीत त्याला शौचास जाण्यासाठी एक भांडे ठेवले जाते. समाजातले लोक मृताला एकटे कधीच सोडत नाहीत आणि रात्री झोपताना मृतासाठी एक दिवा कायम चालू ठेवतात. हे लोक असं मानतात की, जर त्यांनी मृताची निट सेवा केली नाही ,तर त्याची आत्मा कोपेल आणि विघ्न निर्माण करेल.
6/7
मृतदेहांचे विघटन थांबवायला वापरातात रसायन
