पृथ्वीवरील एकमेव ठिकाण जिथं सापडते चंद्रावरची माती; महाराष्ट्रातील 50,000 वर्ष जुनं रहस्यमयी लोणार सरोवर
Lunar Lake in Maharashtra: भारतातील महाराष्ट्रात असलेले लोणार सरोवर हे पृथ्वीवरील सर्वात रहस्यमयी ठिकाण आहे. लोणार सरोवर म्हणजे पृथ्वी आणि अंतराळाला जोडणारा चमत्कारच आहे. चंद्रावर न जाता पृथ्वीवरच आपल्याला चंद्रावरची कशी असते सते पहायला मिळेल. महाराष्ट्रात हे ठिकाण आहे. हे ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील 50,000 वर्ष जुन रहस्यमयी लोणार सरोवर. लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील सर्वात चमत्कारिक ठिकाण आहे. NASA च्या वैज्ञानिकांनाही लोणार सरोवराचे रहस्य उलगडता आलेले नाही.





लोणार सरोवराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील क्षारांचे प्रमाण, आम्लारी गुणधर्म म्हणजेच सरोवराच्या पाण्याची पीएच लेव्हल इतकी जास्त असूनही याच्या बाजूला घेतलेल्या छोट्याशा खड्ड्यात मात्र गोड पाणी मिळते. या पाण्यात कुठलाही जीव जिवंत राहू शकत नाही परंतु यात विविध प्रकारचे जिवाणू, विषाणू, हरितनील शेवाळ आहेत NASA च्या वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उलगडता आलेले नाही.
