पंढरपुरात लगीनघाई, मांडव सजला; वसंत पंचमीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा

Vitthal Rukmini Vivah Sohla 2024 : वसंत पंचमीच्या मुहूर्तावर दरवर्षी श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडतो. यंदा हा सोहळा आज (14 फेब्रवारी) दिवशी पार पडणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपूरात तयारी सुरु असून यंदाच्या विवाह सोहळ्याचं खास आकर्षण म्हणजे संपूर्ण मंदिर हे सुंदर अशा सहा टन फुलांनी सजवलेला आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्यासाठी गजमंडपाची आरास मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे. 

Feb 14, 2024, 09:44 AM IST
1/7

वसंत पंचमीच्या मुहूर्तावर आज (14 फेब्रुवारी) विठ्ठल-रुक्मिणीच्या विवाहसोहळ्यासाठी मंदिर परिसर सजरा आहे. आकर्षक फूलांच्या सजावटीन सारा परिसर बहरला आहे. 

2/7

या आगळ्या वेगळ्या विवाहाची धामधूम आज सकाळपासून पंढरपूर परिसरात सुरु झाली.

3/7

माघ शुद्ध पंचमी म्हणजे वसंती पंचमी. वसंताची चाहूल लागते म्हणून माघ महिन्याती शुद्ध पंचमीला वसंत पंचमी साजरी केली जाते.

4/7

हाच दिवस श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा म्हणून साजरा करतात. आज राजेशाही पद्धतीने हा विवाह सोहळा विठ्ठल मंदिरात मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरा केला जाणार. 

5/7

आजच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर गुलालाती उधळण करण्यात येते. वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत देवाला शुभ्रु पोशाख करुन मूर्तीवर गुलालाची उधळण करण्याची परंपरा गेली अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे.  

6/7

फुलांच्या महालाचे रुप देण्यात आलेल्या विठ्ठल मंडपात विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या उत्सव मूर्ती आणण्यात आल्या. यानंतर मंदिरात विठ्ठल रुक्मिणी स्वयंवराची कथा सांगतात मग साक्षात देवाच्या लग्नाची सुरुवात झाली. 

7/7

फुलांच्या साहाय्याने महालाचे रुप देण्यात आलेल्या विठ्ठल सभा मंडपात विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या उत्सव मूर्ती आणण्यात आल्या. या सोहळ्यात मोजकीच वऱ्हाडी मंडळीं उपस्थिती होते.