24 MP फ्रँट कॅमेराचा स्मार्टफोन भारतात लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स

Mar 23, 2018, 20:49 PM IST
1/5

vivo v9 launched in india price and specifications

vivo v9 launched in india price and specifications

मोबाईल निर्माता कंपनी वीवो ने आपला नवा प्रीमियम स्मार्टफोन वीवो व्ही 9 (Vivo V9) मुंबईत लॉन्च केला आहे. या फोनची सर्वात खास बाब म्हणजे या फोनमध्ये 24 मेगापिक्सलचा फ्रँट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच दोन रियर कॅमेराही देण्यात आले आहेत.

2/5

vivo v9 launched in india price and specifications

vivo v9 launched in india price and specifications

वीवो व्ही 9 फोनमध्ये 6.3 इंचाची 1080x2280 पिक्सल रिझॉल्युशन असलेला 6.3 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 626 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 4GB रॅम सोबतच 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. ही इंटरनल मेमरी मायक्रोएसडी कार्ड्च्या माध्यमातुन 256GB पर्यंत वाढवता येणार आहे.

3/5

vivo v9 launched in india price and specifications

vivo v9 launched in india price and specifications

भारतीय बाजारपेठेत वीवो व्ही 9 फोनची किंमत 22,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन शॅंपेन गोल्ड, पर्ल ब्लॅक आणि सेफायर ब्लू रंगात उपलब्ध आहे. वीवो व्ही 9 या फोनची प्री-ऑर्डर बुकींग फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन इंडियावर सुरु करण्यात आली आहे. या फोनची विक्री २ एप्रिल पासून सुरु होणार आहे आणि या दिवसापासूनच ऑफलाईनही उपलब्ध होणार आहे.

4/5

vivo v9 launched in india price and specifications

vivo v9 launched in india price and specifications

फोनच्या फ्रँट कॅमेऱ्याच्या फ्रँट पॅनलवर 24 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे. फ्रँट कॅमेरा एआर स्टीकर्स, फेस अनलॉक आणि फेस ब्यूटी मोड सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. मागच्या बाजुला दोन सेंसर देण्यात आले आहेत. प्रायमरी सेंसर 16 मेगापिक्सलचा आहे तर सेकेंडरी 5 मेगापिक्सलचा आहे. रियर कॅमेराचा अॅपर्चर एफ/2.0 आहे.

5/5

vivo v9 launched in india price and specifications

vivo v9 launched in india price and specifications

फोनमध्ये 3260 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 4जी एलटीई, व्हीओएलटीई, वायफाय, ब्ल्यूटूथ, जीपीएस आणि मायक्रो-यूएसबी पोर्टचा समावेश आहे. तसेच फोनच्या मागे फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आला आहे.