PICS: 'धडक' सिनेमाच्या सेटवरुन जान्हवी कपूरचे फोटोज झाले Leak

 

Mar 23, 2018, 20:29 PM IST

 

 

1/6

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. मराठी सिनेमा 'सैराट' चा रिमेक म्हणजे 'धडक' या सिनेमाचे शूटिंग सुरू झाले आहे. या सिनेमाला सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खानचा सिनेमा टक्कर देण्याची शक्यता आहे. मात्र, साराच्या सिनेमापूर्वी जान्हवीचा 'धडक' सिनेमा रिलीज होणार आहे. (फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)

2/6

'धडक' हा सिनेमा ६ जुलै २०१८ रोजी रिलीज होणार आहे. तर, सारा अली खानचा 'केदारनाथ' हा सिनेमा २१ डिसेंबर २०१८ रोजी रिलीज होणार आहे. (फोटो सौजन्य - पीटीआय)

3/6

मराठी सिनेमा 'सैराट' सुपरहिट झाला होता आणि मोठा गल्लाही जमवत अनेक रेकॉर्ड्सही तोडले होते. त्याच सिनेमाचा रिमेक 'धडक' आहे.  'धडक' या सिनेमात जान्‍हवी कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्‍टर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)

4/6

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनद्वारा निर्मित सिनेमातून जान्हवी आणि शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. (फोटो सौजन्य - पीटीआय)

5/6

अभिनेत्री श्रीदेवींच्या निधनानंतर जान्हवी कपूर पुन्हा एकदा सिनेमाच्या शूटिंगसाठी परतली आहे. आपल्या बहिणीचा वाढदिवस साजरा केल्यानंतर जान्हवीने 'धडक' सिनेमाचं शूटिंग सुरु केलं. या शूटिंगचे काही फोटोज समोर आले आहेत. या सिनेमात जान्हवी आपल्या आई प्रमाणेच खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)

6/6

'धडक' सिनेमाची शूटिंग सध्या कोलकातामध्ये सुरु आहे. या शूटिंग दरम्यानचे काही फोटोज समोर आले आहेत. या सिनेमात जान्हवी एक सर्वसाधारण तरुणीच्या भूमिकेत दिसणार आहे. (फोटो सौजन्य - पीटीआय)