'आधी लग्न पाण्याचे नंतर माझे' २३ वर्षीय अलकाची कथा
स्वत:च्या लग्नाचा विचार न करता सरपंच अलका यांचा कल गाव पाणीदार करण्याकडे आहे.
उन्हाळ्यात सर्वत्र पाणीटंचाई या गंभीर समस्येने डेकं वर काढले आहे. सध्या महाराष्ट्रात जागोजागी पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यात दुष्काळग्रस्त भागात 'पाणी फाउंडेशन' महत्वाची भूमिका बजावत आहे. पाणीटंचाईवर मात मिळवण्याचा निर्धार नंदुरबार जिल्ह्यातील वीरपूर गावातील सरपंच अलका पवार यांनी केला आहे. भयंकर पाणीटंचाईवर कायमचा तोडगा काढण्यासाठी अलका यांनी 'पाणी फाउंडेशन'सह काम करण्यास सुरूवात केली आहे.


