Weekly Numerology : 'या' मूलांक लोकांच्या सोबत असणार नशीब, तुमच्या भाग्यात काय?

Saptahik Ank jyotish 29 april to 5 may 2024 : दिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 29 एप्रिल ते 5 मेपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात. 

Apr 28, 2024, 12:54 PM IST
1/10

Weekly Numerology 29 april to 5 may 2024 in Marathi

अंकशास्त्रानुसार मेचा पहिला आठवडा अतिशय शुभ मानला गेला आहे. हा आठवडा अनेका लोकांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येणार आहे. असात हा आठवडा 1 ते 9 मूलांकाच्या लोकांसाठी कसा असणार आहे. याबद्दल सांगितलं अंकशास्त्र डॉ. कविता ओझा यांनी 

2/10

मूलांक 1

कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. भविष्यासाठी नियोजन करणार आहात. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. प्रेमसंबंधाबद्दल भविष्याचा विचार करून निर्णय घ्या. नशीब तुम्हाला प्रत्येक पावल्यावर साथ देणार आहे.   

3/10

मूलांक 2

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. भागीदारातून शुभ परिणाम मिळणार आहे. हा आठवडा खर्चिक असणार आहे. भावनिक कारणामुळे खर्च वाढणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये वास्तववादी निर्णय घेतल्यास चांगले परिणाम दिसेल. आठवड्याच्या शेवटी, कोणत्याही निर्णयाबद्दल विचारपूर्वक निर्णय घ्या. 

4/10

मूलांक 3

हा आठवडा प्रेमाचा असणार असणार आहे. कामाच्या ठिकाणी एखाद्या बातमीने मन दुखी होणार आहे. हा आठवडा खर्चिक असणार आह. महत्त्वाचा निर्णय या आठवड्यात टाळा. तुम्हाला लाभाची संधी मिळणार आहे.   

5/10

मूलांक 4

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. तुम्हाला उत्तम संधी मिळणार आहे. या आठवड्यात खर्च वाढणार आहे. प्रेमसंबंधांमध्येही काही बातमी मिळणार आहे ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ होणार आहात. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला प्रयत्नातून यश मिळणार आहे.   

6/10

मूलांक 5

आर्थिक स्थितीत बदल होणार असून तुम्हाला लाभ मिळणार आहे. प्रेमसंबंधात समतोल राखल्यामुळे चांगले परिणाम मिळतील. नातं परस्पर अधिक घट्ट होणार आहे. कार्यक्षेत्रात परिस्थिती हळूहळू सुधारेल. आठवड्याच्या शेवटी वाद टाळा आणि महत्त्वाचा निर्णय घेऊ नका.   

7/10

मूलांक 6

कार्यक्षेत्रात व्यस्त असणार असून तुमची प्रगती होणार आहे. हा आठवडा खूप जास्त खर्चिक ठरणार आहे. गुंतवणुकीवर भर द्या. आठवड्याचा शेवट शांतता तुमच्या आयुष्यात घेऊन येणार आहे. प्रेमसंबंधातील मुद्दे संवादाने सोडवले तर चांगले परिणाम दिसतील.   

8/10

मूलांक 7

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. तुमच्या प्रकल्पात निर्णय तुम्हाला यशस्वी ठरवणार आहे. तुम्ही एकांतात बसून तुमच्या प्रकल्पाशी संबंधित निर्णय काळजीपूर्वक घ्या. आर्थिक स्थिती बरं असणार आहे. या आठवड्यात तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये काही अडचणी येणार आहे. आठवड्याच्या शेवटी, भागीदारीत घेतलेले निर्णय तुमच्यासाठी चांगले ठरणार आहे. 

9/10

मूलांक 8

कार्यक्षेत्रात प्रगती होणार असून काही महत्त्वाची जबाबदारी मिळणार आहे. आर्थिक बाबतीत शुभ असणार आहे. आर्थिक लाभ होणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने प्रेमजीवनात सुखद अनुभव मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्ही कठोर परिश्रम केल्यास चांगले परिणाम दिसणार आहे. 

10/10

मूलांक 9

तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. तुम्हाला काही नवीन जबाबदाऱ्याही मिळणार आहेत. या आठवड्यात तुमच्या प्रकल्पातील यशाचा मार्ग मोकळा होणार आहे. आर्थिक बाबींमध्ये खर्च वाढणार आहे. प्रेमसंबंधांमध्येही संवादाने प्रकरणे सोडवली तर हिताच ठरेल.(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)