Weekly Numerology : 'या' मूलांक लोकांवर बसरणार शनिदेवाची कृपा, तुमच्या नशिबात काय?
Saptahik Ank jyotish 03 to 9 june 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 3 ते 9 जूनपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.
1/9
मूलांक 1

या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती सुधारणार असून आर्थिक लाभ होणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमची संपत्ती वाढवण्याच्या अनेक संधी लाभणार आहेत. कामाच्या ठिकाणी हळूहळू सुधारणा होणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये परस्पर प्रेम मजबूत होणार आहे. तुमच्या जोडीदाराचा सहवासात तुम्हाला आराम मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी अनावश्यक वाद टाळा.
2/9
मूलांक 2

3/9
मूलांक 3

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार असून प्रकल्पात यश प्राप्त होणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टशी संबंधित काही चांगली बातमी मिळणार आहे. आर्थिक प्रगतीची शक्यता असून गुंतवणुकीबाबत खूप गंभीर राहा. या आठवड्यात काही ठोस गुंतवणूकही करणार आहात. प्रेमसंबंधातील नवीन सुरुवात तुमच्या आयुष्यात आनंद देणार आहे. सप्ताहाच्या शेवटी जीवनात सुखद अनुभव मिळणार आहेत.
4/9
मूलांक 4

या आठवड्यात आर्थिक बाबींचे निराकरण होणार आहे. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळणार असून पैशाशी संबंधित बाबींमध्ये तुम्ही जितकी मेहनत कराल तितके तुम्ही दिलासा मिळेल. तुमच्या प्रेमसंबंधात तुम्हाला हवे असलेले बदल साध्य करण्यासाठी वेळ लागणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला मध्यम यश मिळणार आहे. सप्ताहाच्या शेवटी सुख-समृद्धीचे शुभ संयोग घडणार आहेत.
5/9
मूलांक 5

प्रेमसंबंधात, परस्पर प्रेम अधिक घट्ट करणार ठरणार आहे. तुम्ही प्रेम जीवनात आनंददायी वेळ व्यतित करणार आहात. या आठवड्यात तुमचे प्रकल्प आठवड्याच्या उत्तरार्धात अचानक यशस्वी होणार आहे. प्रगतीचे नवीन मार्गही लाभणार आहेत. आर्थिक बाबींवर लक्ष देण्याची गरज असून अधिक पैसे खर्च होणार आहेत. आठवड्याच्या शेवटी काही बातम्या मिळाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटणार आहे.
6/9
मूलांक 6

या आठवड्यात तुम्ही संयमाने कोणताही निर्णय घ्या, तरच तुम्हाला सुख आणि समृद्धी लाभणार आहे. कामाच्या ठिकाणी खुलेपणाने आपले मत व्यक्त केल्यास चांगले परिणाम तुम्हाला मिळतील. आर्थिक बाबतीत खर्च जास्त होणार आहे. याकडे लक्ष देण्याची गरज राहणार आहे. प्रेमसंबंधातही फसवणूक होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी चढ-उतार असतील पण शेवटी यश तुम्हाला मिळणार आहे.
7/9
मूलांक 7

हा आठवडा शुभ असून या आठवड्यात आर्थिक लाभाच्या शुभ संधी तुम्हाला मिळणार आहेत. जर तुम्ही संतुलन राखले आणि तुमच्या गुंतवणुकीकडे लक्ष दिले तर सकारात्मक परिणाम मिळतील. कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. प्रेमसंबंधात, परस्पर प्रेम अधिक घट्ट करणारं ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी, आपण आपल्या प्रियजनांच्या सहवासात आनंददायी वेळ व्यतित करणार आहात.
8/9
मूलांक 8

9/9
मूलांक 9
