बेड गरम करण्यापासून वेफर्स खाण्यापर्यंतचे Job... जगभारातील भन्नाट नोकऱ्या अन् सॅलरी पाहून व्हाल थक्क

weird jobs and salary : नोकरी बदलण्याच्या विचारात असाल, तर आधी नोकरीसाठीचे थोडे चौकटीबाहेरचे पर्यायही पाहून घ्या. कारण या नोकऱ्यांसाठी चक्क तितकाय दणदणीत पगारही दिला जातोय. 

Jan 17, 2024, 12:49 PM IST

weird jobs and salary : साचेबद्ध अशी 9 ते 5 किंवा 9 ते 6 या दरम्यानची नोकरी, साचेबद्ध सुट्ट्या अशा सर्व वातावरणाला तुम्ही कंटाळला आहात का? नोकरी बदलण्याचाच विचार सतत तुमच्या मनात येतोय का? 

1/10

बेड वॉर्मर

weird jobs and salary know interesting facts

बेड वॉर्मर- वाचूनच लक्षात आलं असेल, की थंड पडलेला बेड उबदार करण्यासाठी बेड कम्फर्टर म्हणून नोकरी दिली जाते. अनेक हॉटेल या पदावरील नोकरभरती घेतात. ज्यामध्ये निर्जंतुकीकरण केलेले स्लीपसुट घालून ही माणसं बेडवर झोपतात आणि तो उबदार करतात. त्यांना महिन्याला पगार मिळतो साधारण 16 000 युरोज.  

2/10

प्रोफेशनल क्यूअर

weird jobs and salary know interesting facts

प्रोफेशनल क्यूअर- ब्रिटनमध्ये सहसा अनेक दुकानांबाहेर लांबलचक रांगा पाहायला मिळतात. पण, तिथं एखाद्या सराईत व्यक्तीला रांगेत उभं करून त्याला ताशी 20 युरो इतकं मानधनही दिलं जातं. 

3/10

कूल हंटर

weird jobs and salary know interesting facts

कूल हंटर - व्यवसाय क्षेत्रात सध्या सुरु असणारे ट्रेंड आणि प्रतिस्पर्ध्यांच्या व्यवसायाशी संबंधित आराखडा हेरण्यासाठी ही मंडळी काम करतात. स्पर्धकांची ध्येय्यधोरणं हेरत त्यानुसार काम करत आपल्या कंपनीला फायदा मिळवून ठेवणं हे या मंडळींचं काम. महिन्याकाठी त्यांना पगार मिळतो 25000 युरो. 

4/10

ऐकण्याचे अधिकारी

weird jobs and salary know interesting facts

ऐकण्याचे अधिकारी- तुम्ही सोशल मीडियावर सराईतासारखे वावरत असाल तर, ही नोकरी तुमच्याचसाठी. महिन्याला 61000 युरोज इतका पगार असणाऱ्या या नोकरीमध्ये एक वेगळ्याच धाटणीचं काम करावं लागतं. थोडक्यात इतरांचं ऐकावं लागतं. 

5/10

इल इकोलॉजिस्ट

weird jobs and salary know interesting facts

इल इकोलॉजिस्ट- नद्यांमध्ये उतरून त्यात असणाऱ्या इल माशआंचा आकार, त्यांचं वावरणं या गोष्टींवर लक्ष ठेवलं जातं. या नोकरीसाठी 22000 युरो इतका पगार मिळतो.   

6/10

स्वान मार्क

weird jobs and salary know interesting facts

स्वान मार्कर- ब्रिटनच्या राणीचा एखादा व्हिडीओ पाहिला असेल, तर तिथं राजहंस तुम्हाला दिसलाच असेल. या राजहंसांची दरवर्षी मोजणी केली जाते. थेम्स नदीच्या काठावर असणारे हे राजहंस ब्रिटनच्या राजघराण्याच्या मालकीचे असतात असं सांगितलं जातं. 

7/10

क्रिस्प इन्स्पेक्टर

weird jobs and salary know interesting facts

क्रिस्प इन्स्पेक्टर - एखादा वेफर जेव्हा आपण खातो तेव्हा त्यांचं कुरकुरित असणंही तितकंच महत्त्वाचं. त्याचसाठी एक नोकरी असून, यामध्ये  क्रिस्प इन्स्पेक्टर जास्त शिजलेले किंवा व्यवस्थित न शिजलेले आणि विचित्र आकाराचे वेफर्स वेगळे काढतो.   

8/10

टी टेस्टर

weird jobs and salary know interesting facts

टी टेस्टर- तुम्हाला माहितीये का, जगभरातील विविध प्रकारच्या चहाची चव घेण्यासाठीसुद्धा एक नोकरी आहे. या पदावर काम करणारी व्यक्ती महिन्याला 25000 युरो इतका पगार घेते. या व्यक्तीला चहाच्या चवीमधील फरक कळण्यासाठी पाच वर्षे रितसर प्रशिक्षण घ्यावं लागतं. 

9/10

मास्टर डिस्टीलर

weird jobs and salary know interesting facts

मास्टर डिस्टीलर - ही नोकरी अनेकांच्याच आवडीची असावी. कारण, इथं जिनमध्ये नेमका कोणता घटक किती प्रमाणात पडतो इथपासून जिनची चव घेण्याचीही संधी मिळते. या नोकरीसाठी महिन्याला 30000 युरो इतका पगार दिला जातो. 

10/10

बीफइटर

weird jobs and salary know interesting facts

बीफइटर- लंडनला राणीच्या महालाबाहेर दिसणारे उंच काळी टोपी घातलेले सैनिक तुम्ही पाहिले असतील, हे सैनिक राजघराण्यातील शाही दागदागिन्यांच्या संरक्षणासाठी जबाबदार असतात. त्यांनी लष्करात किमान 22 वर्षांची सेवा देणं अपेक्षित असतं.