ऐकावं ते अजब ! 'या' देशात लोक लग्नासाठी दुसऱ्याची बायको पळवतात, शिक्षाही नसते...
Weird Marriage Rituals : आपल्याकडे विवाह करताना अनेक गोष्टी पाहिल्या जातात. आजही मुलगी - मुलगा दाखविण्याचा कार्यक्रम केला जातो. तसेच प्रेम विवाह होत असतात. काही जण आधी रिव्ह इन रिलेनशिपमध्ये असतात. नंतर ते लग्न बंधनात अडकतात. मात्र, जगात असा एक देश आहे की, चक्क दुसऱ्याची बायको पळवून लग्न केले जाते. या देशात तशी प्रथा असल्याचे सांगितले जाते. मात्र, जरी दुसऱ्याची बायको पळवली तरी येथे शिक्षा केली जात नाही.
Surendra Gangan
| Jun 13, 2023, 14:45 PM IST
1/5

लग्नासंदर्भात जगभरात विविध विधी आणि प्रथा आहेत. भारतात, प्रत्येक राज्यातील वेगवेगळ्या समुदायांमध्ये लग्नाबाबत वेगवेगळ्या परंपरा आहेत. लग्नासाठी दुसऱ्याची बायको पळविण्याची प्रथा पश्चिम आफ्रिकेत वोडाबे जमातमध्ये प्रथा आहे. इथे लग्न करण्यापूर्वी पुरुषांना दुसऱ्या पुरुषाची बायको चोरावी लागते. अशा प्रकारे विवाह करणे ही या जमातीची ओळख आहे. दुसऱ्याची बायको चोरल्यानंतर आणि नंतर लग्न केल्यानंतर यासाठी त्यांना ना दंड, ना शिक्षा असते.
2/5

आफ्रिकेत अशी एक जमात आहे, जिथे लोकांना लग्न करण्यासाठी दुसऱ्याच्या बायका चोराव्या लागतात. गेरेवोल लोक आजही या प्रथेचे पालन करत आहेत. त्यामुळे दरवर्षी गेरेवोल महोत्सवाचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये मुलं कपडे घालून चेहऱ्यावर रंग लावतात. यानंतर ते नृत्य आणि इतर अनेक माध्यमांनी दुसऱ्यांच्या बायकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो.
3/5

4/5
