जेवताना खरंच 32 वेळा घास चावून खायचा असतो का? जाणून घ्या यामागील सत्य

जेवताना अनेकदा आपल्याला मोठ्यांकडून घास 32 वेळा चावावा असं सांगितलं जातं. पण खरंच घास 32 वेळा चावून खायचा असतो का? त्याचे नेमके काय फायदे आहेत हे जाणून घ्या  

Jun 19, 2024, 18:18 PM IST

जेवताना अनेकदा आपल्याला मोठ्यांकडून घास 32 वेळा चावावा असं सांगितलं जातं. पण खरंच घास 32 वेळा चावून खायचा असतो का? त्याचे नेमके काय फायदे आहेत हे जाणून घ्या

 

1/7

घरात जेवताना तुम्हाला कधी ना कधी आई, वडील किंवा ज्येष्ठांनी एक घास 32 वेळा चावून खावावा असं सांगितलं असेल. 32 वेळा घास चावून खाल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात असं सांगितलं जातं.  

2/7

32 वेळा घास चाऊन खावं तसा हा जुना नियम आहे. यामागे वैज्ञानिक आणि आरोग्याशी संबंधित कारणंही आहेत.   

3/7

घास 21 वेळा चाऊन खाल्ल्यास अन्न चांगल्या प्रकारे पचतं. यामागे कोणताही रिसर्च नाही. पण हे सत्य आहे की, अन्न नीट चाऊन खाल्ल्यास ते वेगवेगळ्या फ्लेव्हर्सना रिलीज करत आणि कार्बोहायड्रेटला पचतं.   

4/7

32 वेळा घास चाऊन खाण्याचा नियम तसा प्रत्येकासाठी नाही. पण अन्न व्यवस्थित चाऊन खाणं प्रत्येकासाठी फायदेशीर असतं.   

5/7

पचनक्रियेत सुधारणा

पचनक्रियेत सुधारणा

अन्न जितके जास्त चघळले जाते तितके त्याचे लहान तुकड्यांमध्ये रूपांतर होते, यामुळे पोटातील पचन प्रक्रियेस मदत होते आणि अन्न पचणे सोपे होते.

6/7

जीवनसत्त्वे आणि खनिजे

जीवनसत्त्वे आणि खनिजे

अन्न योग्य प्रकारे चघळल्याने त्यातील पोषकद्रव्ये चांगल्या प्रकारे शोषली जातात ज्यामुळे शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात.

7/7

वजनावर नियंत्रण

वजनावर नियंत्रण

हळूहळू खाणं आणि जास्त चघळणं जलद पोट भरण्यास मदत करतं. यासोबत तुम्ही अन्न कमी प्रमाणात खातात, ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.