YouTube वर सर्वात जास्त कोणत्या गोष्टी सर्च केल्या जातात? उत्तर जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

अगदी प्रत्येक वयोगटातली लोक YouTube वर आपल्या आपल्या आवडीनुसार व्हिडीओ सर्च करून बघतात. 

| Nov 09, 2024, 07:41 AM IST

Most Searched Things On YouTube: अगदी प्रत्येक वयोगटातली लोक YouTube वर आपल्या आपल्या आवडीनुसार व्हिडीओ सर्च करून बघतात. 

1/7

युट्युबची लोकप्रियता

लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वचजण युट्युबवर व्हिडीओ पाहतात यावरून युट्युबच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येतो. आपल्याला काहीही शोधायचे असेल किंवा काही शिकायचे असेल तर आपण लगेच यूट्यूब उघडतो.

2/7

सगळ्याच विषयांचे व्हिडीओ उपलब्ध

युट्युबवर, तुम्हाला प्रत्येक विषयावर अनेक व्हिडीओ मिळतील जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार बघू शकता. युट्युबवर काहीही शोधणे खूप सोपे आहे आणि यामुळेच आज आजी-आजोबांच्या वयातील लोक देखील यूट्यूबवर चांगला वेळ घालवतात.

3/7

युट्युब सर्च टॉपिक

यूट्यूबवर अनेक गोष्टी सर्च केल्या जात असल्या तरी, जर आपण सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या विषयाबद्दल बोलले, तर म्युझिक व्हिडीओचे नाव पहिले येते. लोक त्यांच्या आवडीनुसार आणि ट्रेंडनुसार यूट्यूबवर संगीत व्हिडीओ शोधतात.

4/7

DIY व्हिडीओ

आजकाल प्रत्येकाला आपली छोटी-छोटी कामे स्वतःहून  पूर्ण करायची असतात. अशा परिस्थितीत, DIY व्हिडीओ यूट्यूबवर खूप शोधले जातात. जिथे तुम्हाला घरच्या कामापासून ते केसांच्या काळजीपर्यंत सर्व काही घरबसल्या शिकायला मिळते.

5/7

गेमिंग व्हिडीओ

गेमिंग व्हिडीओ देखील यूट्यूबवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या गोष्टींपैकी एक आहेत. येथे तुम्हाला नवीन गेम आणि त्यांच्याशी संबंधित सर्व  माहिती सहज मिळू शकते.

6/7

वेगवेगळे Vlog होतात सर्च

आजकाल यूट्यूबवर व्लॉगिंगचा खूप ट्रेंड आहे. सेलिब्रिटींपासून सामान्य लोकांपर्यंत, प्रत्येकजण येथे त्यांच्या दैनंदिन जीवनाबद्दल व्लॉग बनवतो. लोकांना टाईमपास करण्यासाठी यूट्यूबवर असे व्लॉग पाहायला आवडतात.

7/7

मेकअप आणि हेअर स्टाइल

मेकअप आणि हेअर स्टाइल व्हिडीओ देखील यूट्यूबवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या गोष्टींपैकी एक आहेत. ज्याच्या मदतीने लोक पार्लरमध्ये न जाता घरी बसून पार्लरसारखा मेकअप आणि सुंदर हेअर स्टाइल करायला शिकतात.