कोर्ट मॅरेज आणि रजिस्टर मॅरेजमध्ये नेमका काय फरक असतो? 99 टक्के लोक सांगू शकणार नाहीत
Court Marriage And Marriage Registration : सध्या सर्वत्र लग्न समारंभाची धामधूम सुरु आहे. विवाहाचा शुभ मुहूर्त पाहून अनेक जोडपी लग्नबंधनात अडकतायत. काहीजणांना लग्न धामधुमीत करण्याची हौस असते तर काही अतिशय साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज करून विवाह करतात. अनेकदा आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणारी जोडपी धार्मिक पद्धतीने विवाह करण्यापेक्षा कायदेशीर पद्धतीने विवाह करण्यास प्राधान्य देतात.
Pooja Pawar
| Dec 04, 2024, 17:36 PM IST
1/7

2/7

बऱ्याचवेळा तुम्ही कोर्ट मॅरेज किंवा रजिस्टर मॅरेज हे शब्द ऐकले असतील. अनेकांना हे दोन्ही गोष्टी एकसारख्याच वाटत असतील, पण या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. कोर्ट मॅरेज म्हणजे जेव्हा तुम्ही कोणत्याही पद्धतीने लग्न केले नसेल अशावेळी तुम्ही कोर्ट मॅरेज करू शकता. यात मॅरेज ऑफिसरच्या साक्षीने विशेष विवाह कायद्यानुसार कोर्टात कायदेशीर लग्न करू शकता.
3/7

कोर्ट मॅरेज करण्यापूर्वी तुम्हाला अर्ज करावा लागतो. मग नोटीस निबंधकाद्वारे प्रसिद्ध केली जाते, जेणेकरून जोडप्याच्या लग्नाबाबत कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला काही अडचण असेल तर ते आक्षेप नोंदवू शकता. जर अर्ज केल्यावर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांमध्ये कोणत्याही व्यक्तीने जोडप्याच्या लग्नावर आक्षेप नोंदवला नाही तर जोडपी बिनदिक्कतपणे कोर्ट मॅरेज करू शकतात.
4/7

5/7

6/7

7/7
